vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

3700 प्रगणक व पर्यवेक्षक यांना 15 दिवसीय जनगणना प्रशिक्षण**नागरिक घरबसल्या स्वत:ही करू शकतात ऑनलाईन स्व-नोंदणी* 

*3700 प्रगणक व पर्यवेक्षक यांना 15 दिवसीय जनगणना प्रशिक्षण**नागरिक घरबसल्या स्वत:ही करू शकतात ऑनलाईन स्व-नोंदणी*

नवी मुंबई प्रतिनिधी-भारत सरकारच्या वतीने सन 2027 मध्ये होणाऱ्या जनगणनेच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जनगणनेच्या तयारीस सुरुवात करण्यात आलेली आहे. यंदाची जनगणना डिजिटल पद्धतीने होत असून नागरिकांसाठी स्व-नोंदणी (Self Enumeration) करण्याचा पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाईन पद्धतीने नोंदविणे अधिक सुलभ होणार आहे.

 या जनगणना प्रक्रियेच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त मास्टर ट्रेनर यांचेमार्फत एकूण 45 फील्ड ट्रेनर्सना दि. 6 एप्रिल ते 8 एप्रिल 2026 या कालावधीत सखोल प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये डिजिटल अॅपचा वापर करण्याची प्रक्रिया, माहिती संकलनाची पद्धत तसेच नागरिकांशी संवाद साधून माहिती संकलित करण्याचे कौशल्य या बाबींचा समावेश होता. यापुढील टप्प्यात प्रशिक्षित फील्ड ट्रेनर्समार्फत प्रगणक (Enumerators) व पर्यवेक्षक (Supervisors) यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

 सदर 45फिल्ड ट्रेनर हे जनगणनेच्या कामासाठी प्रत्यक्ष घरोघरी भेट देणारे नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रगणक व पर्यवेक्षक यांना दिनांक 23 एप्रिल ते 8 मे 2026 पर्यंत 15 दिवस प्रशिक्षण देणार आहेत. या प्रशिक्षण वर्गास 23 एप्रिलपासून सर्वच विभागांत सुरूवात झालेली आहे. आठही विभाग कार्यालयांमध्ये प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले आहे.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी 3700 प्रगणक व पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रत्येकी 40 ते 50 प्रगणक व पर्यवेक्षकांच्या एकूण 77 बॅच तयार करण्यात आल्या असून, हे प्रगणक व पर्यवेक्षक दिनांक 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीमध्ये प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन जनगणनेची माहिती संकलन करण्याचे काम करणार आहेत.

 ही सर्व संकलित माहिती डिजिटल पध्दतीने जनगणना व्यवस्थापन आणि निरीक्षण प्रणाली (Census Management and Monitoring System अर्थात CMMS) यावर नोंदवली जाणार आहे. तरी सर्व नागरिकांनी 1 मे 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत se.census.gov.in या जनगणना पोर्टलला भेट देऊन स्वतःची माहिती स्वतः भरावी असे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी जनगणना प्रक्रियेचे महत्व लक्षात घेऊन त्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा आणि देशाच्या विकासासाठी आवश्यक असलेली अचूक व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून द्यावी असे आवाहन आहे.

 सदर प्रशिक्षण व जनगणना प्रक्रिया ही आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी तसेच उपआयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संबंधित विभागातील चार्ज अधिकारी व सहाय्यक आयुक्त यांच्या देखरेखीखाली यशस्वीरित्या पार पाडली जात आहे

0000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रातील 9 मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित…

साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार प्रदान; डॉ. सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ला मराठीसाठी पुरस्कार देशातील २४ भाषांतील बालसाहित्यिकांचा सन्मान

vishwatmaklokswamivarta

भविष्यवेधी विकास आणि तंत्रज्ञानाधरीत नियोजन प्रक्रियेतील गतिमानतेसाठी ‘महाटेक’ संस्था उभारावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

ग्रामीण भागातील प्रत्येक भगिनी स्वयंपूर्ण व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील – ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे

ब्राह्मण सेवा मंडळा’चा शतकमहोत्सवी श्री गणेशोत्सव -**‘उकलुया हस्तरेखांचे गूढ’*

जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेत,फिल्म पोस्टर मेकिंग चॅलेंज स्पर्धा..