vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फेसोमवारी (दि.३०) रोजगार मेळावा

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फेसोमवारी (दि.३०) रोजगार मेळावा

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- कौशल्य विकास,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने जागेवर निवड संधी देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती बसस्टँड रोड, मालजीपुरा छत्रपती संभाजीनगर येथे सोमवार दि.३० रोजी सकाळी १० वा. रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यात छत्रपती संभाजीनगर येथील नामांकीत कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. त्यात आय सी आय सी आय बँक, कोटक महिंद्रा बँक, ईक्युटास स्मॉल फायनांन्स बँक, नेक्सलॅड कंन्सल्टींग एल एल पी इत्यादी नियोक्त्यांनी कोणतीही पदवी/ डिप्लोमा- मेकॅनिकल/इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक, आय टी आय – ऑल ट्रेड, एच एस सी, एस एस सी उतीर्ण इत्यादी पात्रताधारक उमेदवारांसाठी रोजगाराची २२८ रिक्तपदे उपलब्ध असून विविध शैक्षणिक व व्यावसायीक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

 या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध रिक्तपदांना एम्प्लॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजरआयडी व पासवर्ड ने लॉग इन होऊन ऑनलाईन अप्लाय करावे किंवा बायोडाटाच्या ४ प्रती घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

संकेतस्थळावर नोंदणी करताना अथवा रिक्तपदासाठी अप्लाय करताना काही अडचण आल्यास कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक ०२४०-२९५४८५९ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

ऑरिक हॉल, शेंद्रा मध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना,कार्यालयासाठी सवलतीच्या दरात भाड्याने जागा उपलब्धतेचा निर्णय

उन्हाळी हंगाम 2026 साठी ‘ई-पीक पाहणी’ सुरू; 24 मेपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे निर्जलीकरण प्रशिक्षण…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावेत..

vishwatmaklokswamivarta

अमरावती मुख्य पोस्ट ऑफिसच्या वेळेत वाढआता रात्री 7.30 वाजेपर्यंत पोस्टाचे व्यवहार करता येणार!

सैन्यदल अधिकारी पदाच्या परीक्षेसाठी मोफत पूर्वप्रशिक्षण