vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

रसच्या रंगतदार दुनियेत हरवलेलं मन; खरेदीसोबत प्रेरणेचीही मेजवानी!”वाशीच्या CIDCO Exhibition Centre मध्ये भरलेला ‘महालक्ष्मी सरस’ सोहळा…

रसच्या रंगतदार दुनियेत हरवलेलं मन; खरेदीसोबत प्रेरणेचीही मेजवानी!”वाशीच्या CIDCO Exhibition Centre मध्ये भरलेला ‘महालक्ष्मी सरस’ सोहळा…

विशेष लेख

नवी मुंबई प्रतिनिधी-रसच्या रंगतदार दुनियेत हरवलेलं मन; खरेदीसोबत प्रेरणेचीही मेजवानी!”वाशीच्या CIDCO Exhibition Centre मध्ये भरलेला ‘महालक्ष्मी सरस’ सोहळा… आणि त्या सोहळ्याला दिलेली माझी कालची भेट — केवळ एक फेरफटका नव्हता, तर ग्रामीण जिद्दीचा, स्त्रीशक्तीचा आणि स्वावलंबनाच्या प्रवासाचा जिवंत साक्षात्कार होता

प्रदर्शनात पाऊल टाकताच जाणवलेली ऊर्जा वेगळीच होती. धुपबत्तीचा दरवळ, रंगीबेरंगी स्टॉल्स आणि गर्दीतूनही जाणवणारा आत्मविश्वास—हे सगळं काही वेगळंच सांगत होतं. प्रत्येक स्टॉल हा केवळ विक्रीचा नव्हता, तर ‘उमेद’ आणि ‘लखपती दीदी’ या उपक्रमांतून उभ्या राहिलेल्या स्वप्नांचा आरसा होता.

या प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे अध्यक्ष Narendra Patil यांनी व्यक्त केलेले विचार मनाला भिडणारे होते. ‘उमेद’ अभियान आणि ‘लखपती दीदी’ उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना स्वावलंबनाची नवी दिशा मिळत आहे, ही बाब प्रत्यक्ष इथे अनुभवता आली. गावागावातून आलेल्या बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना इथे शहरी बाजारपेठ मिळत आहे—ही केवळ संकल्पना नाही, तर वास्तवात साकारलेली क्रांती आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर Sujata Suraj Patil यांनीही व्यक्त केलेली भावना इथे प्रत्येक ठिकाणी जाणवत होती—“महिला सक्षम झाली तर समाज आणि देश अधिक बळकट होतो.” खरंच, इथल्या प्रत्येक महिलेमध्ये जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याची प्रेरणा दिसत होती.

स्टॉल्सवर फिरताना राजश्री गणोरकर यांच्या धुपबत्त्यांपासून ते सिंधू कुंभार यांच्या मातीच्या कलाकृतींपर्यंत, प्रत्येक वस्तूमध्ये कष्टांची ऊब होती. शिल्पा सावंत यांच्या नैसर्गिक सौंदर्यप्रसाधनांमध्ये निसर्गाची साद होती, तर कांचन-योगिता पाटील यांच्या ‘आजीची गोधडी’मध्ये मायेचा स्पर्श. हे सगळं पाहताना जाणवलं—या वस्तू विकल्या जात नाहीत, त्या अनुभव म्हणून घरी नेल्या जातात.

खाद्यपदार्थांच्या विभागात तर महाराष्ट्राची चव खुलून दिसत होती. पूर्वा रणदिवे, कालिंदा सुरवसे, कांचन गजमल, उषा धुतारगाव यांसारख्या महिलांनी त्यांच्या कष्टातून तयार केलेल्या पदार्थांनी “घरगुती चव” आणि “विश्वास” या दोन गोष्टी एकत्र आणल्या होत्या.

या सगळ्या अनुभवामागे ‘उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’चे भक्कम कार्य उभे आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी Nilesh Sagar यांनी सांगितल्याप्रमाणे, 2011 पासून सुरू झालेल्या या अभियानाने लाखो महिलांना स्वावलंबी बनवले आहे. आज राज्यातील 6 लाखांहून अधिक स्वयं सहायता समूह, हजारो ग्रामसंघ आणि लाखो कुटुंब या चळवळीचा भाग झाले आहेत. ‘उमेद मॉल’ आणि ‘उमेद मार्ट’सारख्या संकल्पनांमुळे महिलांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध होत आहे—हे या प्रदर्शनातून स्पष्ट जाणवत होते.

अवर सचिव Dhanvant Mali यांनी दिलेली आकडेवारी या कार्याची भव्यता अधोरेखित करणारी आहे—कोट्यवधी रुपयांचा पतपुरवठा, लाखो कुटुंबांचा सहभाग आणि हजारो उत्पादक गटांची निर्मिती… ही केवळ संख्या नाही, तर उभारी घेतलेल्या आयुष्यांची साखळी आहे.

या प्रदर्शनात फिरताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली—‘सरस’ म्हणजे बाजारपेठ नाही, तर परिवर्तनाचा उत्सव आहे. इथे प्रत्येक महिला ‘लखपती दीदी’ होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि तिच्या डोळ्यांत स्वप्नांबरोबर आत्मविश्वासही चमकत आहे.

२४ मार्च ते ४ एप्रिल २०२६ या कालावधीत सुरू असलेल्या या ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनाला प्रत्येकाने आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन पुन्हा एकदा मनापासून करावेसे वाटते. कारण इथे केवळ खरेदी होत नाही—इथे स्वप्नांना हात दिला जातो, जिद्दीला सलाम केला जातो आणि ‘सक्षम महिला, विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेचा जिवंत अनुभव घेतला जातो

संजीवनी स.जाधव-पाटील सहायक संचालक (माहिती)विभागीय माहित कार्यालय,कोकण विभाग, नवी मुंबई

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय लोक न्यायालयात ७०४ कोटींची प्रकरणे निकाली

मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसह  राज्यातील २२ जिल्ह्यांतून १ हजारांहून अधिक मंदिर विश्वस्तांची शासनाकडे जोरदार मागणी देवस्थानांच्या भूमींचे रक्षण करण्यासाठी अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट राज्यात तात्काळ लागू करा !

vishwatmaklokswamivarta

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था, विश्रामगृहपरिसरात मिरवणूका काढणे, घोषणा देण्यास निर्बंध…

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे प्रीपेड ऑटो रिक्षासेवा १ जूनपासून सुरू करावी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय रुग्णालयांमधील तपासणी व उपचार हे नि:शुल्क..

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत सहभाग नोंदविण्याचे युवक-युवतींना आवाहन