vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रीया सुरु16 एप्रिलपर्यंत मुदत

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रीया सुरु16 एप्रिलपर्यंत मुदत

 

सातारा प्रतिनिधी– राज्य शासनाकडून घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा 2026 ही रविवार दि.21 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आली असून या परिक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रीया दि. 27 मार्च पासून सुरु झाल्याची मााहिती पुणे येथील महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी दिली.

 इयत्ता 1 ली ते 5 वी साठी पेपर 1 सकाळी 10.30 ते दुपारी 1 वा. व इयत्ता 6 वी ते 8 वी साठी पेपर 2 दुपारी 2.30 ते 5 वा पर्यंत वेळ मर्यादा आहे. सर्व व्यवस्थापन, सर्व परिक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक अथवा शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत: ही परिक्षा होणे अनिवार्य आहे. या परिक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सुचना महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची मुदत 16 एप्रिल 2026 पर्यंत आहे. 9 ते 21 जून पर्यंत प्रवेशपत्राची ऑनलाईन प्रिंट काढून घ्यावी. काही प्रशासकीय अडचणीमुळे या वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने परिक्षार्थ्यांनी अद्यावत माहिती परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळास नियमित भेट द्यावी, असे आवाहनही परीक्षा परिषदेचे आयुक्त श्री.चोथे यांनी कळविले आहे.

 

000

संबंधित पोस्ट

परराज्यातील अवैध मद्याची महाराष्ट्रात तस्करी मुंबई व सातारा भरारी पथकाची १ कोटी ८६ लाखांची मोठी संयुक्त कारवाई

vishwatmaklokswamivarta

उद्योजक मेळाव्यासाठी नोंदणी करा – जिल्हाधिकारी अशोक काकडे

♦️२००६ बॉम्बस्फोट प्रकरण : राज्य सरकार सुप्रीम कोर्टात करणार आव्हान.

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांनी ड्युरंड कप स्पर्धा 2025 च्या ट्रॉफींचे अनावरण केले

कृषी विद्यापीठांनी पारंपरिक देशी बियाण्यांचे उन्नतीकरण करावे : राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषी विद्यापीठांना सूचना राज्यात ‘नैसर्गिक शेती’ची क्रांती आणण्यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा

#यशवंतराव_चव्हाण_द्रुतगती मार्गावर वाहतूक तात्पुरती बंद..मुंबई पुणे एक्सप्रेस वे तीन तासाचा दोन दिवस ब्लॉग असणार आहे याकरता पर्यायी मार्ग जाणून घ्यावे