vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना शहरात पाम सण्डे निमित्त प्रभात फेरी उत्साहात संपन्न

जालना शहरात पाम सण्डे निमित्त प्रभात फेरी उत्साहात संपन्न

 जालना,(प्रतिनिधी)- जालना शहरात ख्रिश्‍चन समाज बांधवांनी पाम सण्डे (झावळ्यांचा रविवार) उत्साहात साजरा केला. प्रभू येशू ख्रिस्त यांच्या यरुशलेममध्ये झालेल्या विजयी प्रवेशाच्या घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. झावळ्यांच्या रविवार निमित्त सकाळी 7 वाजेपासून जालना शहरातील विविध ठिकाणी प्रभात फेर्‍या काढण्यात आल्या होत्या.

  मिशन हॉस्पिटल परिसरातील क्राईस्ट चर्च कॅथेड्रल, जुना जालना भागातील नुतन वसाहत येथील टॉम डॉप्सन मेमोरियल चर्च व जालना जिल्ह्यातील विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थना व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळीच प्रभात फेरीमध्ये लहान मुलांनी, महिलांनी, युवक-युवतींनी हातात फुलांनी सजलेल्या खजुरीच्या झाडाच्या लहान फांद्या म्हणजेच झावळ्या हातात घेवून प्रभात फेरी काढली यावेळी ‘‘होसान्ना, होसान्ना प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादीत असो’’, अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला होता. या प्रसंगी लहान मुलांनी लेझीम सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. चर्च परिसर खजुरीच्या झावळ्यांनी व फुलांनी आकर्षकरित्या सजविण्यात आला होता. यावेळी भक्तांनी हातात झावळ्या घेऊन येरुशलेम मधील प्रभू येशूचे जे स्वागत स्वागत करण्यात आले होते त्या घटनेच्या स्मरणार्थ घोषणा देत भव्य अशा मिरवणुका काढल्या होत्या.

नुतन वसाहात येथे टॉम डॉप्सन मेमारियल चर्चचे रेव्ह.बिबीशन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळीच प्रभात फेरी काढण्यात आली होती यावेळी जार्ज उगले व टॉम डॉप्सन मेमोरियल चर्च तरुण मंडळाच्या परिश्रमामुळे नुतन वसाहात येथील प्रभात फेरी यशस्वीरित्या संपन्न झाली.

 या उत्सवाच्या निमित्ताने श्रद्धाळूंनी प्रार्थना करत शांतता, प्रेम आणि बंधुभावाचा संदेश दिला.

———————-

संबंधित पोस्ट

नमुंमपा निवडणूकीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे सुयोग्य नियोजन…

vishwatmaklokswamivarta

कबुतरांना वाचवा, मनःशांतीसाठी एक विशाल धार्मिक बैठक”

पवित्र पोर्टलद्वारे राज्यातील ३० हजारांहून अधिक शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरू

फार्मर आयडी विना खत वितरण होणार नाही ; शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करावी..

सेवा पंधरवडा : जळगाव जामोद तालुक्यातील महाराजस्व समाधान शिबिरात नागरिकांना लाभांचे वितरणआमदार डॉ संजय कुटे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

आयपीएल जिंकल्यानंतर चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर टीम जबाबदार !पोलिस काही जादूगर नाहीत किंवा त्यांच्याकडे ‘अल्लादिनचा चिराग’ नाही असंही कॅटने म्हटलं सर्व IPS अधिकाऱ्यांचे निलंबन मागे..