vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक *’श्रीगुरु गौरव दीक्षा शताब्दी महोत्सवात’ सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा गौरव !सद्गुरु स्वाती खाडये यांनी स्वीकारला सन्मान !*

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक *’श्रीगुरु गौरव दीक्षा शताब्दी महोत्सवात’ सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा गौरव !सद्गुरु स्वाती खाडये यांनी स्वीकारला सन्मान !*

राज्य प्रतिनिधी-

 *पुणे* – दत्त परंपरेतील महान संत आणि शक्तिपात योगाचे अध्वर्यू प.पू. गुळवणी महाराज यांच्या दीक्षा शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने, सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या अद्वितीय धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यासाठीचा हा सन्मान सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वतीने सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांनी स्वीकारला. शाल, श्रीफळ, मोत्यांची माळ आणि सन्मानचिन्ह असे सन्मानाचे स्वरूप होते. पुण्यातील एरंडवणे येथील ‘श्रीवामन निवास’ येथे ‘श्रीगुरु गौरव दीक्षा शताब्दी महोत्सव (२०२०-२०२६)’ हा दिमाखदार सन्मान सोहळा पार पडला.

हा महोत्सव अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरला. श्रीवासुदेव निवास स्थापनेचा हीरक महोत्सव, प.पू. ब्रह्मश्री श्रीदत्त महाराज कवीश्वर पुण्यतिथी रौप्य महोत्सव, प.पू. योगतपस्वी श्रीनारायणकाका ढेकणे महाराज जयंती शताब्दी महोत्सव, विद्यमान उत्तराधिकारी पू. शरदभाऊ जोशी यांचा ‘योगभक्ती अमृत महोत्सव’ होता.  या प्रसंगी भारतभरातील २६ संतांचा सन्मान करण्यात आला. समाजाला सन्मार्ग दाखवण्याचे कार्य करणाऱ्या सत्पुरुषांचे आशीर्वाद मिळावेत, या उदात्त हेतूने ‘श्री प.पू. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प.पू. श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज ट्रस्ट’च्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात उपस्थित संतांनी साधनेचे महत्त्व अधोरेखित केले.

 कार्यक्रमाचा प्रारंभ वेदमंत्रपठण, पादुकापूजन आणि ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या जयघोषाने झाला. समारोप प.पू. टेंबे स्वामी विरचित ‘दत्त त्रिपदी’च्या व्हायोलिन वादनाने भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. श्री. शिरीषकुमार आणि श्री. अरुणकुमार उपाध्ये यांनी हे वादन सादर केले.*श्री. चेतन राजहंस,* राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था (संपर्क : ७७७५८ ५८३८७)

संबंधित पोस्ट

विशेष गौरव पुरस्कारासाठी 22 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

गडचिरोलीत मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा**मत्स्य संगोपन प्रात्यक्षिक प्रकल्पाचे उद्घाटन*

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी श्रीमती अश्विनी भिडे विराजमान

सांगलीच्या सौंदर्यात भर पडेल अशी दर्जेदार कामे करा- पालकमंत्री चंद्रकांत पाटीलमहानगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या कामकाजाचा घेतला आढावा

सातारा जिल्ह्यातील युगप्रवर्तक कवी बा.सी. मर्ढेकर यांच्या निवास्थानाचा स्मारकापर्यंतचा प्रवास आणि या प्रवासास दिल्ली येथे* *होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिलेला उजाळा**गोष्‍ट बा.सी. मर्ढेकर यांच्या स्मारकाची….*

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांनी पारदर्शकतेने कर्तव्य पार पाडावे – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार जिल्हा परिषदेच्या आयुक्त तपासणीचे चार वर्षांचे अहवाल वाचन संपन्न

vishwatmaklokswamivarta