vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

वाशी येथे जुने सुस्थितीतील कपडे संकलन उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद 813.3 किलो कपड्यांना मिळाले नवजीवन..

वाशी येथे जुने सुस्थितीतील कपडे संकलन उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद 813.3 किलो कपड्यांना मिळाले नवजीवन..

         नवी मुंबई प्रतिनिधी   नवी मुंबई महानगरपालिका, प्रोजेक्ट मुंबई आणि मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ, वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी येथील साहित्य मंदिर सभागृहात जुने सुस्थितीतील कपड्यांचे संकलन हा उपक्रम अत्यंत यशस्वीपणे राबविण्यात आला. या उपक्रमाला नवी मुंबईतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत वापरून झालेले चांगल्या स्थितीतील कपडे मोठ्या प्रमाणात जमा केले.

          संकलित करण्यात आलेले साधारणत: 813.3 किलो जुने कपडे कचऱ्यात जाण्याऐवजी त्यांना नवजीवन देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या सीबीडी बेलापूर येथील टेक्सटाईल रिकव्हरी फॅसिलिटी (TRF) केंद्रात पाठवण्यात आले.

केंद्र सरकारच्या वस्त्रद्योग मंत्रालय अंतर्गत वस्त्र समिती आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सीबीडी बेलापूर येथे वस्त्र पुनर्प्रक्रिया प्रकल्प (TRF) अत्यंत उत्तम प्रकारे राबविण्यात येत असून या प्रकल्पामध्ये जुने कपडे गोळा करून त्यांचे वर्गीकरण, प्रक्रिया तसेच त्यापासून नव्या वस्तूंची निर्मिती (अपसायकलिंग) केली जाते. यामुळे क्षेपणभूमीवर जाणारा कापडी कचरा लक्षणीय प्रमाणात कमी होण्यास मदत होत आहे.

           नवी मुंबई महानगरपालिका, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय, एसबीआय फाऊंडेशन आणि टिसर इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या केंद्रामध्ये महिला बचत गटांतील महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार लोकसहभागावर भर देते येथे सोसायट्या, वसाहती, थ्री आर सेंटर्स अशा विविध ठिकाणाहून आलेल्या जुन्या कपड्यांची छाननी करून त्यांचा पुनर्वापर व अपसायकलिंग करण्यात येते. या उपक्रमामुळे कचरा व्यवस्थापनास चालना मिळत असून पर्यावरण संवर्धनालाही मोठा हातभार लागत आहे.

          वाशीतील मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळाने या अभिनव उपक्रमात पुढाकार घेतला असून प्रोजेक्ट मुंबई या संस्थेच्या सहकार्याने या कपडा संकलनाचे प्रभावी नियोजन करण्यात आले. यावेळी प्लास्टिक कचऱ्याचेही संकलन करून ते पुनर्वापरासाठी पाठवण्यात आले. या उपक्रमाला अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे आणि उद्यान विभाग उपायुक्त श्रीम. स्मिता काळे यांचे मार्गदर्शन लाभले असून मंडळाचे अध्यक्ष श्री. सुभाष कुळकर्णी, प्रोजेक्ट मुंबईचे अधिकारी श्री. रोहित फडतरे, टिसर ट्रस्टच्या श्रीम.वैशाली कदम तसेच मंडळाचे सभासद यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

          नागरिकांना पर्यावरणपूरक सवयी अंगिकारण्यासाठी प्रोत्साहित करीत नवी मुंबई अधिक स्वच्छ व सुंदर करण्याच्या उद्देशाने या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आभार मानण्यात आले.

0000

संबंधित पोस्ट

ठाणे येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह आणि माजी सैनिक विश्रामगृह येथे कर्मचारी भरती..

गडचिरोली पोलिसांचा “एक गाव, एक वाचनालय” उपक्रम — मौजा वांगेतुरी येथे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते

vishwatmaklokswamivarta

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा राष्ट्रीय नमुना पाहणीची ७५ वर्षे ही मध्यवर्ती संकल्पना

विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत’ योजनेद्वारे५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला लाभ- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

ऑपरेशन अभ्यास” मॉक ड्रिल ठाण्यात यशस्वी; आपत्कालीन तयारीची प्रभावी चाचणी*

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलचे शतक महोत्सव व इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, कोपरीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त वर्षभर विविध उपक्रम राबविले जाणार