vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात ८ ते २५ एप्रिलदरम्यान ‘अमृत परिवार सर्वेक्षण अभियान’ 

जिल्ह्यात ८ ते २५ एप्रिलदरम्यान ‘अमृत परिवार सर्वेक्षण अभियान’

रायगड -अलिबाग, प्रतिनिधी — महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या स्वायत्त संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत विविध योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी ‘अमृत परिवार सर्वेक्षण अभियान’ राबविण्यात येणार आहे. हे अभियान ८ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार आहे.
अमृत संस्थेच्या माध्यमातून अशा जाती-जमातींना लाभ दिला जातो, ज्यांना इतर कोणत्याही संस्था किंवा महामंडळांच्या योजनांचा लाभ मिळत नाही. सध्या ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, हिंदू नेपाळी, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगूनथर, जाट, कानबी, कोमटी/वैश्य आदी जातींचा अमृतच्या लक्षित गटात समावेश आहे
या सर्वेक्षण मोहिमेदरम्यान अमृत संस्थेचे प्रतिनिधी संबंधित कुटुंबांशी थेट संपर्क साधून त्यांच्या सामाजिक व आर्थिक स्थितीची माहिती संकलित करणार आहेत. तसेच विविध सामाजिक संस्था, संघटना आणि मंडळांकडूनही माहिती घेतली जाणार आहे.
अमृतच्या योजनांमध्ये विद्यार्थी, तरुण, महिला, व्यावसायिक आणि शेतकरी अशा कुटुंबातील प्रत्येक घटकासाठी विविध उपक्रमांचा समावेश असून, या योजनांचा लाभ जास्तीत जास्त पात्र कुटुंबांपर्यंत पोहोचविणे हा या अभियानाचा उद्देश आहे.
लक्षित गटातील व्यक्ती, संस्था व संघटनांनी या कालावधीत अमृतच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून आपल्या कुटुंबाची नोंदणी करावी व योजनांची सविस्तर माहिती घ्यावी, असे आवाहन अमृतच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.
संपर्कासाठी शैलेश मराठे (९११२२२८७५९),मंगेश ढेबे (८१४९५५२१४३)अधिक माहितीसाठी अमृतच्या अधिकृत संकेतस्थळाला https://mahaamrut.org.in/भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, रायगड महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)शैलेश मराठे यांनी केले आहे.
००००

संबंधित पोस्ट

सौरऊर्जा प्रकल्पांतील स्थानिक स्वराज्य संस्थांचा आर्थिक हिस्सा कमी करण्याबाबत-समिती स्थापन करणार- मंत्री उदय सामंत

युद्धजन्य परिस्थितीत युवकांनी केला विजयाचा संकल्प: हनुमान जयंतीला सामूहिक गदापूजन !रामराज्य स्थापनेसाठी देशभरात ८५० हून अधिक ठिकाणी, तर मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात ४५ हून अधिक ठिकाणी, सामूहिक ‘गदापूजन’ संपन्न!

राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजना ज्येष्ठ कलाकारांना दरमहा पाच हजार रुपये मानधन..

गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह मिरज येथे प्रवेश प्रक्रिया सुरू…

दप्तर हलके करण्याच्या नावाखाली शिक्षण विभागाने केल्या कोटींच्या चुका !पुस्तकात वह्यांची पाने घालण्याच्या प्रयोगात शासनाचे१३५ कोटी वाया; सुराज्य अभियानाकडून चौकशीची मागणी…

विद्यापीठांनी ‘स्कूल – कनेक्ट’ व महिला सक्षमीकरणासाठी ‘स्वयंसिद्धा’ उपक्रम कसोशीने राबवावेत – राज्यपाल जिष्णु देव वर्मा अंमलबजावणीचा त्रैमासिक अहवाल लोकभवन येथे पाठवण्याची सूचना