vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पीक विम्याची नुकसान भरपाई अदा – पीक विमा जिल्हा व्यवस्थापक 

चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पीक विम्याची नुकसान भरपाई अदा – पीक विमा जिल्हा व्यवस्थापक

 

 बुलढाणा, प्रतिनिधी -प्रधानमंत्री पीक विमा योजना सन २०२४-२५ अंतर्गत चिखली तालुक्यातील मेरा बु. गावातील शेतकऱ्यांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार खरीप हंगाम २०२४-२५ चा पीक विमा मंजूर नुकसान भरपाई वितरित झाली आहे. शेतकऱ्यांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार एक हजार रुपयांपेक्षा अधिकची नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करणे आवश्यक आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात तुटपुंजी रक्कम जमा झाल्याचा गैरसमज निर्माण झाला असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोणत्याही लाभार्थी शेतकऱ्याला एक हजार रुपयांपेक्षा कमी रक्कम अदा करता येत नाही, असे जिल्हा व्यवस्थापक, पीक विमा कार्यालय यांनी स्पष्ट केले आहे.

खरीप २०२४ हंगामातील या मंजूर विम्यामध्ये सोयाबीन आणि तूर या पिकांसाठीचे दावे समाविष्ट आहेत, जे पोस्ट हार्वेस्ट (PH) आणि लोकललाइज्ड (LC) अशा दोन्ही प्रकारच्या नुकसानीसाठी होते. सदर बाबी अंतर्गत शासनच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोणत्याही लाभार्थी शेतकऱ्याला रक्कम १००० रु. पेक्षा कमी रक्कम अदा करता येत नाही. तरी सुद्धा पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना कमी रक्कम आली असेल त्यांनी तालुका स्तरावरील पीक विमा कार्यालयाला भेट द्यावी, असे आवाहन पीक विमा कार्यालयाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

प्रसारमाध्यमांमध्ये शेतकऱ्यांना कमी रक्कम जसे की, ८२.६६ रु., १९.२३ रु, १४.३२ रु, २६१ रु, ८०.७४ रु, मिळाल्याचे नमूद केले असून या आकडेवारी बाबतीत पीक विमा कार्यालयाने स्पष्टीकरण दिले आहे. चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेल्या विमा रक्कमेची आकडेवारी कार्यालयाकडून खालील प्रमाणे जाहीर केली आहे. त्यानुसार चिखली तालुक्यातील मेरा बु. गावातील सचिन एकनाथ पडघान यांच्या खात्यात रु. १३,३३४.७८, सचिन कुंडलिका पडघान रु. ३,८६१.६२, सचिन राजेंद्र पडघान रु. १६,३१६.६९, सचिन शिवाजी पडघान रु. ३,५१४.१७, सचिन वसंत पडघान रु. ८,६८९.४३, मोहन विजय पडघान रु. ६,५५५.६८, मोहन अंबादास पडघान रु. ९,६५४.५८, अमोल सुधाकर पडघान रु. १३,७२०.८४, अमोल अण्णा पडघान रु. ३१,४३०.२०, अमोल समाधान पडघान रु. १३,८७५, अमोल दत्तात्रय पडघान रु. ८,३२५, अमोल शिवदास पडघान रु. १५,४४७.५३, अमोल विनायकराव पडघान रु. १४,४८२.३९, भागवत कडुबा पडघान रु. ५४,६६५.५६, भागवत काशिराव पडघान रु. ४,८२७.८१, अनिल भानुदास गायकवाड रु. १२,८७६.५७, सुधाकर ज्ञानदेव पडघान रु. ५१,८४५.४०, सुधाकर केशव पडघान रु. ४,१५१.६९, विजय लक्ष्मणराव पडघान रु. ७८,३६१.४८, विजय तोताराम पडघान रु. १०,२०५.४९, विजय अशोक पडघान रु. ११,२९६.८९ अशी ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे, अशी माहिती पीक विमा कार्यालय, बुलढाणाचे जिल्हा समन्वयक/व्यवस्थापक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

“माध्यमांमध्ये व सोशल मीडियावर प्रसिद्ध होणाऱ्या माहितीवरून गैरसमज निर्माण होत आहेत. शासनाच्या नियमांनुसार कोणत्याही शेतकऱ्याला रु. १००० पेक्षा कमी नुकसान भरपाई दिली जात नाही. तरीही काही शेतकऱ्यांना रक्कम कमी वाटल्यास किंवा कमी आल्यास त्यांनी तालुका पीक विमा कार्यालयाशी संपर्क साधावा. आमचे कार्यालय शेतकऱ्यांच्या सर्व तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्याचा प्रयत्न करणार आहे,” अशी प्रतिक्रिया पीक विमा कार्यालय बुलढाणाचे जिल्हा समन्वयक/व्यवस्थापक नितेश वाघ यांनी दिली आहे.

000

संबंधित पोस्ट

मुंबईच्या विकासाला नवे पंख: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण कोस्टल रोड आज पासून २४ तास खुलालवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणारवर्षाला किमान ५० किलोमीटरचे मेट्रो मार्ग उभारण्याचे काम सुरू- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमुंबईच्या विकासाला नवे पंख: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण कोस्टल रोड आज पासून २४ तास खुलालवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणारवर्षाला किमान ५० किलोमीटरचे मेट्रो मार्ग उभारण्याचे काम सुरू- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मिरजच्या शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्रात प्रवेश प्रक्रीया सुरु

vishwatmaklokswamivarta

दिशा’ समितीची आढावा बैठक संपन्नजिल्ह्यातील विकासाची कामे तात्काळ पार पाडावी – खासदार डॉ.कल्याण काळे

vishwatmaklokswamivarta

विकासकामांतून साधली जातेय राज्याची प्रगती महाराष्ट्राचा नव्याने विकास करण्यासाठी पुन्हा येणार महायुती- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध योजनांचे अर्ज भरा आता ऑनलाईन…

vishwatmaklokswamivarta

बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ च्‍या प्रत्‍यक्ष निवडणूक कार्यक्रमाच्‍या अनुषंगाने महानगरपालिका अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिस, उत्‍पादन शुल्‍क खात्‍याचे अधिकारी यांची संयुक्‍त बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta