vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महाराष्ट्रात ई-वाहनांना चालना;शासनाकडून प्रोत्साहनपर निधी वितरित- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

महाराष्ट्रात ई-वाहनांना चालना;शासनाकडून प्रोत्साहनपर निधी वितरित- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, प्रतिनिधी- राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवून पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण-२०२५ अंतर्गत विविध घटकांना प्रोत्साहनपर निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे

या निर्णयानुसार राज्यातील प्रमुख शहरी वाहतूक उपक्रमांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. बेस्ट (मुंबई), नागपूर महानगरपालिका (NMT), पुणे महानगरपालिका (PMPL), कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका (NMMT) आणि ठाणे महानगरपालिका (TMT) या सहा उपक्रमांना मिळून ₹४.५५ कोटींचा निधी देण्यात आला आहे. यामुळे शहरांमध्ये सार्वजनिक ई-वाहतूक अधिक सक्षम होणार आहे. ई-वाहनांच्या मागणीला चालना देण्यासाठी उत्पादक कंपन्यांना अनुदान देण्यात आले आहे. यात बजाज ऑटो लि., महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लि. आणि Euler मोटर्स प्रा. लि. यांना तीन चाकी वाहनांसाठी एकूण ₹२.५१ कोटींहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे.

याशिवाय, अथर एनर्जी प्रा.लि., टीव्हीएस मोटर कंपनी, चेतक टेक्नॉलॉजी आणि इतर कंपन्यांना ई-दुचाकी व ई-तीनचाकी वाहनांसाठी एकूण ₹४.४५ कोटींपेक्षा अधिक प्रोत्साहन रक्कम वितरित करण्यात येणार आहे.

तसेच सन. २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ई-वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी २४६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

या निर्णयामुळे राज्यातील ई-वाहन क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून, प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीनेही हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

00000

संबंधित पोस्ट

अनुसूचित व नवबौद्ध मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू

सेवा हक्क दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आवाहन 

लख्खीशाह बंजारा यांचा त्याग प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी : पालकमंत्री संजय राठोड उत्साहपूर्ण वातावरणात जयंती सोहळा संपन्न, सामाजिक एकतेचा दिला संदेश

मुंबईतील स्वच्छता विषयक ‘सुविधा केंद्र’ उपक्रम पथदर्शी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई महानगर प्रदेशात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला गती· मुंबईत २४ केंद्रे, ९ प्रगतीपथावर· ७.५ लाख नागरिकांना स्वच्छतेचे शिक्षण ५.५ लाख नागरिकांनी घेतला सुविधा केंद्राचा लाभ…

vishwatmaklokswamivarta

तुंग, आष्टा, कारंदवाडी येथील पाणंद रस्त्याचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्याहस्ते उद्‌घाटन- शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करून मानले प्रशासनाचे आभार

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील शिवाजी पार्कातील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याला रंग फासण्याचा प्रयत्न, परिसरात तणाव…

vishwatmaklokswamivarta