vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२७-नियोजित विकास कामे समन्वयाने वेळेत पूर्ण करावीत मुख्य सचिव राजेश अग्रवाल-त्र्यंबकेश्वर येथे विविध विकास कामांची पाहणी…

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२७-नियोजित विकास कामे समन्वयाने वेळेत पूर्ण करावीत मुख्य सचिव राजेश अग्रवाल-त्र्यंबकेश्वर येथे विविध विकास कामांची पाहणी…

*नाशिक, प्रतिनिधी* : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर परिसरात सुरू असलेली पायाभूत सोयीसुविधांची सर्व विकास कामे निर्धारित वेळेत, उच्च दर्जासह संबंधित विभागांनी समन्वयातून पूर्ण करावीत, अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिल्या.

त्र्यंबकेश्वर येथे आज मुख्य सचिव श्री. अग्रवाल यांनी विविध विकास कामांची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजेश औटी, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. पवन दत्ता, अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, कार्यकारी अभियंता राहुल पाटील, नवनाथ सोनवणे, मनोज ढोकचौळे,अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, तहसीलदार गणेश जाधव, त्रंबक नगर परिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, उपविभागीय अभियंता अभिजित शेलार, उमाकांत कुमावत, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे, सहाय्यक वनरक्षक (वन्यजीव संरक्षण) प्रशांत खैरनार, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता योगेश्वर पाटील आदींसह विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्य सचिव श्री. अग्रवाल म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांना सुरक्षित, स्वच्छ व सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे. नाशिक–त्र्यंबकेश्वर सहा पदरी रस्त्याच्या कामांना गती देण्यासोबतच गुणवत्तेवर भर देण्यात यावा. कुशावर्त कुंडातील पाण्याची नियमित स्वच्छता, कुंडातील कचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी करावी. कुशावर्त कुंड परिसरातील विकास कामे करताना धार्मिक व ऐतिहासिक वारशाचे महत्त्व लक्षात घेत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे. पर्वणी काळात भाविकांच्या मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर कुशावर्त परिसरातील स्वच्छता व्यवस्थापनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचेही निर्देश त्यांनी दिले

बिल्वतीर्थ परिसरात सुरू असलेल्या नगर परिषदेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत. पाणी शुद्धीकरण प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहणार नाही यासाठी तांत्रिक बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करावे. तसेच सिंचन विभागाने घाट, प्रयाग तीर्थ येथे आवश्यक पायाभूत सुविधा तातडीने पूर्ण कराव्यात.गोदावरी नदी प्रवाही राहण्यासाठी बेझे धरणावरील गौतमी गोदावरी धरण ते त्रंबकेश्वर उपसा सिंचन योजनेची कामे गतीने नियोजित वेळेत पूर्ण करावीत. तसेच कुंभमेळा कालावधीत जलपुरवठा यंत्रणा सक्षम व अखंडित ठेवण्यावर भर देण्यात यावा. अशा सूचनाही मुख्य सचिव श्री. अग्रवाल यांनी दिल्या. यावेळी उपस्थितांनी आपापल्या विभागामार्फत सुरू असलेल्या कामांची माहिती दिली

0000

 

000000

संबंधित पोस्ट

अशोक कांबळे यांच्या हत्येचा तिव्र निषेध – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*  

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान स्पर्धाअधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशासनात गतिमानता व लोकाभिमुखताआणण्यासाठी अभियानात सक्रीय सहभाग घ्यावा- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

स्ट्र्क्चरल ऑडिटबाबत नागरिकांना आवाहन

जमीन आरोग्य व्यवस्थापनासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन आवश्यक :डॉ संग्राम काळे*

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात वनपर्यटन विकसित करा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांप्रती संवेदनशील राहून त्यांना शासकीय मदत तत्परतेने उपलब्ध करून द्या,वनसंपदेचा महसूल वाढवण्यासाठी फर्निचर निर्मितीवर भर

नवी मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोन जणाला अटक नवी मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोन जणाला अटक