vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

टेबल टेनिसच्या मैदानात जिल्हाधिकाऱ्यांची फटकेबाजी-जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या प्रत्यक्ष सहभागाने खेळाडूंमध्ये संचारले नवचैतन्य 

टेबल टेनिसच्या मैदानात जिल्हाधिकाऱ्यांची फटकेबाजी-जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या प्रत्यक्ष सहभागाने खेळाडूंमध्ये संचारले नवचैतन्य

खेळ प्रतिनिधी प्रतिनिधी

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अश्ववेध मैदानावर आयोजित ‘छत्रपती संभाजीनगर विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा’ या स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचा खेळातील प्रत्यक्ष सहभाग. केवळ मार्गदर्शक म्हणून न थांबता, जिल्हाधिकारी मित्तल स्वतः टेबल टेनिसच्या मैदानात उतरल्या. त्यांनी हाती बॅट घेत चपळाईने केलेले सर्व्हिस आणि स्मॅश पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यांच्या या स्पोर्ट्समन स्पिरीटमुळे जालना संघातील खेळाडूंमध्ये वेगळेच नवचैतन्य निर्माण झाले. केवळ प्रशासकीय कामातच नव्हे, तर खेळाच्या मैदानातही आपण तितकेच तत्पर आहोत, हे त्यांनी टेबल टेनिसच्या स्पर्धेत उतरून दाखवून दिले. प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळतानाच खेळाप्रती असलेली त्यांची ही ओढ खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरली.

संबंधित पोस्ट

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत पुणे विभागीय क्रीडा निपुणता केंद्र सुरू

लातूर विभागात मिशन लक्ष्यवेध अंतर्गत ॲथलेटिक्स व कुस्तीचे निवासी क्रीडा निपुणता केंद्र सुरू होणार; खेळाडूंनी २० मार्चपर्यंत अर्ज सादर करावेत

भारतीय महिला कुस्तीपटूंचा जलवा ! U20 आशियाई #WrestlingChampionships च्या तिसऱ्या दिवशी ७पदक

नवे सचिव माजी क्रिकेटपटू देवजीत सैकिया  यांनी जय शाह यांच्या जागी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BBCI) सचिवपदाची सूत्रे स्वीकारली..

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून आयोजितप्रशासन चषक क्रिकेट स्पर्धेत पोलीस विभाग विजेता

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कारांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत  प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन