vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याव्यवसायस्थानिक बातम्या

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) या संस्थेचा ९९ वा स्थापना दिवस राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) या संस्थेचा ९९ वा स्थापना दिवस राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

मुंबई प्रतिनिधी-फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) या संस्थेचा ९९ वा स्थापना दिवस राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

मध्य पूर्वेतील युद्धामुळे जगातील प्रत्येकाचे जीवन बाधित झाले आहे. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. शताब्दी वर्षात पदार्पण करीत असलेल्या फिक्की संस्थेने या युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर विशेषतः सेवा तसेच सूक्ष्म, लघु व माध्यम उद्योगांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांचे मूल्यांकन करावे व नुकसान कमी करण्याच्या दृष्टीने शिफारसी कराव्या असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

यावेळी पणन मंत्री जयकुमार रावल, फिक्कीचे अध्यक्ष अनंत गोयंका, फिक्कीचे वरिष्ठ उपाध्यक्ष विजय शंकर, संस्थेच्या महासंचालक ज्योती वीज, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती आदी उपस्थित होते.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते फिक्कीचे गेल्या तीस वर्षांमधील माजी अध्यक्ष राजीव भारती मित्तल, हर्ष पती सिंघानिया, राजीव चंद्रशेखर, हाबिलं खोराकीवाला, हर्ष मरीवाला, सरोज कुमार पोद्दार, ओंकार कंवल, डॉ. ए. सी. मुथैय्या, राजेंद्र लोढा, चिरायू अमीन, सुधीर जालान, के. के. मोदी, ए. एस. कासलीवाल, दीपक बँकर, ए. के. रुंगटा आदींचा त्यांच्या उद्योग जगातला दिलेल्या योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.

संबंधित पोस्ट

प्रशासकीय अधिकारी शासन निर्णयाची अंमलबजावणी करत नाहीत- दलित आघाडी जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे,तालुकास्तरीय दलित आदिवासी भुमिहिन कार्यकर्ता मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद :

नुकसानग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल – मंत्री गिरीश महाजन,नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश; मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी ४ लाख रुपयाची मदत..

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात इंधनाचा सुरळीत पुरवठा राखत समानतेने इंधन वाटप करा- जिल्हाधिकारी पंकज आशिया जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोल, डिझेल पुरवठ्याबाबत आढावा बैठक संपन्न

ग्रामविकास विभागाच्या योजनांची १०० दिवसांच्या विशेष कार्यक्रमाद्वारे प्रभावीपणे अंमलबजावणी करावी-ग्राम विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे

vishwatmaklokswamivarta

अखेर वक्फ दुरूस्ती विधेयक लोकसभेत मंजूर* *तब्बल १२ तासांच्या चर्चेनंतर झालं मतदान!*विधेयकाच्या बाजूने २८८ मते पडली. ● तर, विरोधात २३२ मते पडली.

दहशतवाद्याला आणि त्यांच्या समर्थकांन शोधून काढेल आणि शिक्षा करेल. आम्ही शेवटापर्यंत त्यांचा पाठलाग करू. दहशतवादामुळे भारताचा आत्मा कधीही तुटणार नाही. दहशतवादाला शिक्षा ही होणारच. न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी