vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या प्रलंबित मागण्या आणि समस्यांवर सखोल चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या प्रलंबित मागण्या आणि समस्यांवर सखोल चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

राज्य प्रतिनिधी 📍मंत्रालय

अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या प्रलंबित मागण्या आणि समस्यांवर सखोल चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत आयोजित बैठकीत सांगितले.

भरती प्रक्रियेसंदर्भातील प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने होणाऱ्या विलंबामुळे पर्यवेक्षिका पदासाठीची वयोमर्यादा उलटून जाणाऱ्या सेविकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. याशिवाय अन्य मागण्यांवरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

बैठकीस एकात्मिक बालविकास प्रकल्प आयुक्त माधवी सरदेशमुख, सहसचिव वि.रा.ठाकूर, भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष अनिल ढुमणे आणि अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

संबंधित पोस्ट

स्टुडंट फॅसिलिटेशन सिस्टीम’मुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा; डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे सर्व निकाल वेळेत जाहीर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळावरील विमानांच्या ‘पार्किंग’ ची सुविधा वाढवा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

पीएम सेतू योजनाःऔद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे उन्नतीकरण;रोजगारक्षम कौशल्यासाठी जिल्ह्यातील उद्योगांचा सहभाग

नळगंगा – पैनगंगा नदीजोड प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासणार नाही- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण मंदिर समितीच्या शिष्टमंडळाने घेतली सदिच्छा भेट

कृषी क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार– कृषिमंत्री कोकाटे

vishwatmaklokswamivarta