vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

खेड राजगुरुनगर मध्ये घडली घटना : देव तारी त्याला कोण मारी ,दीडशे फूट खोल दरीत कोसळला पण तरी बचावला

खेड राजगुरुनगर मध्ये घडली घटना : देव तारी त्याला कोण मारी ,दीडशे फूट खोल दरीत कोसळला पण तरी बचावला

पुणे प्रतिनिधी  :राजगुरूनगर : मध्यरात्रीच्या वेळेस, नवीन खेड घाटातून मोटार दगडधोंड्यांवर आपटत दीडशे फूट खोल दरीत पडली तरी प्रवासी चालकाचा जीव वाचल्याची किमया सोमवारी रात्री घडली. वेळ आली होती पण काळ नव्हता या म्हणीचा प्रत्यय आला होता. पोलीस व कार्यकर्ते वेळेत पोहचल्याने त्याचे प्राण वाचले.

सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास, पुणे नाशिक महामार्गावरून एक फियाट कंपनीची मोटार (क्र. एम एच १५ एफ एन १५७३) नाशिककडून पुण्याकडे चालली होती. संजय मधुकर खैरनार ( वय ४९, रा. नाशिकरोड, नाशिक ) हे स्वतः गाडी चालवत होते. ते पुण्यातील आपल्या साडूंकडे चालले होते. नवीन खेड घाटातून मोटार जात असताना नादुरुस्त वाटत होती, म्हणून त्यांनी ती एका बाजूला घेतली आणि गिअर – अॅक्सेलेटर तपासत होते. तेवढ्यात अचानक त्यांचा गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी डाव्या बाजूच्या दरीत सुमारे दीडशे फूट खोल पडली. नुकतेच घाटाचे काम झालेले असल्याने मोठ्या दगड-गोट्यांचा भराव केलेला आहे. त्यांवरून आपटत आणि नंतर झाडाझुडुपांवर आदळत गाडी खाली जाऊन एका ठिकाणी अडकली.

कुणीतरी भल्या माणसाने ताबडतोब खेड पोलिसांना फोन केला. सहायक पोलीस निरीक्षक राहुल लाड, पोलीस स्वप्नील गाढवे, संतोष घोलप, शेखर भोईर,अर्जुन गोडसे, होमगार्ड गुलाब लोखंडे, बाळा भांबुरे आदी पोलीस व होमगार्ड काही तरूणांसह तेथे तात्काळ पोहचले. ते खाली उतरून मोटारीजवळ पोहचले. त्यांनी काचा फोडून खैरनार यांना बाहेर काढले. खैरनार मागच्या व पुढच्या सीटांमध्ये अडकलेले होते. ते जवळपास बेशुद्ध होते, पण कुठलीही मोठी जखम, रक्तस्राव दिसत नव्हता. सर्वांनी आळीपाळीने मिळून उचलून त्यांना वरती रस्त्यावर आणले आणि रुग्णवाहिकेतून लगेच सुश्रुत हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ते ठीक असून गंभीर जखमी नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वेळीच पोलिसांना लगेच समजल्याने आणि लवकर मदत पोहचविल्याने खैरनार त्यांचे प्राण वाचले. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, अशी भावना यावेळी मदत करणाऱ्यांनी व्यक्त केली.

संबंधित पोस्ट

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरूच; बुखारेस्टहून 250 भारतीयांचे दुसरे विमान पोहोचले दिल्लीला

vishwatmaklokswamivarta

राज्याच्या जलधी क्षेत्रात नियंत्रण ठेवण्यासाठी आता ड्रोनचा वापर- राज्यातील 07 सागरी जिल्ह्यातील 09 ठिकाणी पहिल्या ड्रोन प्रणालीचे उड्डाण..

vishwatmaklokswamivarta

पेंच अभयारण्यातील न्यू तोतलाडोह गावातील पुनर्वसनामुळे विस्थापित झालेल्या लोकांना नियमाप्रमाणे सर्व सुविधा देण्यात याव्यात, अशा सूचना मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

vishwatmaklokswamivarta

पुढील आठवड्यात बॅंक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप.

vishwatmaklokswamivarta

पुणे विभागातील घरगुती नळजोडणीची कामे मिशन मोडवर करावीत- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

नागरीकांनी उष्माघातापासून बचाव करावा *आपत्ती व्यवस्थापनचे आवाहन