vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात विशेष अध्ययनासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन    

अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात विशेष अध्ययनासाठी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दरवर्षी अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये पदव्युत्तर पदवी व संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पीएचडी) राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची प्रक्रिया सुरु झाली असून विद्यार्थ्यांकडून अर्ज शुक्रवार 15 मे 2026 पर्यंत मागविण्यात आली आहेत. त्यासंबंधीची जाहिरात राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या घडामोडीमध्ये विस्तृत स्वरुपात प्रसिद्ध केली आहे.

या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी. साठी अद्यावत (QX World University Ranking) २०० च्या आतील परदेशात शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. त्यापैकी ३० टक्के जागांवर मुलींची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येते.

सन २०२६–२७ या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी.अभ्यासक्रमासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्ज www.fs.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन करावी. त्याची प्रत समाज कल्याण आयुक्तालय, ३ चर्च रोड पुणे- ४११००१ येथे सादर करावा, असे आवाहन आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी केले आहे.

याबाबतची www.maharashtra.gov.in/site/viewallnews किंवा www.maharashtra.gov.in/site/upload/pdf/fs-adv-२०२६-२७.pdf या शासनाच्या संकेतस्थळावर सविस्तर जाहिरात दिली आहे.

00000

संबंधित पोस्ट

पी.एम. किसान योजनेचे तसेच नमो शेतकरी योजनेचे हप्ते येणे बंद झालेल्या शेतकऱ्यांनी कृषी सहायक व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी संपर्क साधावा

महसूल दिन गुणगौरव सोहळा संपन्न अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लोकाभिमुख काम करणे आवश्यक   –महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

भोकरदनमध्ये शिवसेनेचा शक्तीप्रदर्शनात्मक समर्थन कार्यक्रम संजय राऊतांवरील आरोपांमागे राजकीय सूडभावना –खासदार राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून पुष्पवृष्टी

सामाजिक वनीकरण विभागाचा उपक्रम;वृक्ष उत्पादक व खरेदीदार मेळाव्यात ४४९ जणांचा सहभाग

vishwatmaklokswamivarta

परभणीच्या पुरातत्व वारशाचे संवर्धन करून जागतिक स्तरावर नेणार– राज्यमंत्री तथा परभणी पालकमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर

अभय योजना २०२५ अंतर्गत एचएएल मार्फत एकाच वेळी २,४७०.९७ कोटींची भरपाई प्रलंबित कर देयक असलेल्या सार्वजनिक उपक्रमांना (पीएसयू)कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta