vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

इगतपुरीच्या सर्वांगीण विकासासाठी १५ दिवसांत कृती आराखडा सादर करा – मंत्री दादाजी भुसे इगतपुरी नगरपरिषद आढावा बैठक

इगतपुरीच्या सर्वांगीण विकासासाठी १५ दिवसांत कृती आराखडा सादर करा – मंत्री दादाजी भुसे इगतपुरी नगरपरिषद आढावा बैठक

नाशिक, प्रतिनिधी: इगतपुरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पाणी पुरवठा, आरोग्य सेवा, घनकचरा व्यवस्थापन, पायाभूत सुविधा आणि पर्यटन विकास या बाबींना प्राधान्य देऊन १५ दिवसांच्या आत सविस्तर कृती आराखडा सादर करावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.इगतपुरी शहरातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे वाचनालय सभागृह येथे इगतपुरी नगरपरिषद व तालुक्यातील विविध विषयांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते, यावेळी इगतपुरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा शालिनी साबळ , माजी आमदार निर्मला गावित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश शिंपी, तहसीलदार अभिजीत बारवकर, नगरपालिका शाखेचे सह आयुक्त शाम गोसावी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) साईलता सामलेटी, उपनगराध्यक्ष मंगेश शिरोळे, इगतपुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण, पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री भुसे म्हणाले की, इगतपुरीकरांना दररोज शुद्ध व नियमित पाणीपुरवठा मिळणे ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या पाणीपुरवठा योजनेची क्षमता अपुरी पडत असल्याने वितरण यंत्रणा मजबूत करून भविष्यातील गरजा लक्षात घेऊन दीर्घकालीन नियोजन करावे. पाणीउचल, साठवण आणि वितरण यामध्ये तांत्रिक सुधारणा करावी. शासकीय रुग्णालयात आवश्यक मनुष्यबळ, वैद्यकीय उपकरणे, औषधसाठा आणि रुग्णवाहिका सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत.

०००

संबंधित पोस्ट

कुंभमेळा; जिल्ह्यातील नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन जारी,नागरिकांनी संपर्क करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर..भाजपा सरचिटणीस विनोद तावडे, राज्य मंत्री आणि रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले तर पक्षाचे नेते माया ईवनाते आणि रामराव वडकुते यांना उमेदवारी जाहीर.

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘बिमा सखी योजने’चा ऐतिहासिक शुभारंभ” – शिवराज सिंह चौहान

विभागीय सहायक भाषा संचालक योगेश शेट्ये यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ कोकण भवनात संपन्न

फलटणमध्ये शेतकरी व ग्रामपंचायतीच्या – १०० एकर क्षेत्रावर फळबाग व देशी वृक्ष लागवड-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहानाला उद्योग जगताचाही सकारात्मक प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण भागाच्या विकासासाठी पायाभूत सुविधांच्या विकासावर शासनाचा भर–पालकमंत्री शंभूराज देसाई*

vishwatmaklokswamivarta