vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची-त्रैमासिक सांख्यिकी (ER १) माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी

शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची-त्रैमासिक सांख्यिकी (ER १) माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:- रायगड जिल्ह्यातील शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी सेवायोजन कार्यालये‍ (रिक्तपदे अधिसूचित करणे सक्तीचे) कायदा, १९५९ व नियम १९६० च्याकलम ५ (१) अन्वये सार्वजनिक क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय आस्थापना तसेच कलम ४ (२ अन्वये खाजगी क्षेत्रांतील कायद्यांतर्गत असणाऱ्या सर्व आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या मनुष्यबळाची (पुरुष-स्त्री) दर तिमाही (मार्च/जून/सप्टेंबर/डिसेंबर) अखेरची माहिती महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने सादर करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीम. अ.मु.पवार यांनी केले आहे.

त्यानुषंगाने आपल्या आस्थापनेची माहे मार्च,२०२६ अखेर संपणाऱ्या जानेवारी ते मार्च या तिमाहीची नमुना ईआर-१ मधील त्रैमासिक विवरणपत्र आस्थापनांनी या विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर Employment याटॅबवरील Employer (List a Job) याला क्लीक करुनआपल्या आस्थापनेचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरुन लॉगिन करावे लॉगिन झाल्यावर आपल्या आस्थापनेची माहिती अद्ययावत करुन ER-1 वर क्लिक करावे Enter ER-1 याद्वारेú आपल्याकडील अचूक माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी. हे त्रैमासिक विवरणपत्र सादर करण्याचा कालावधी दिनांक ३० एप्रिल, २०२६ पर्यंत आहे, याची सर्वशासकीय व खाजगी आस्थापनांनी नोंद घ्यावी.

त्याचप्रमाणे प्रत्येक आस्थापनेने आपल्या आस्थापनेचा नोंदणी तपशील (Employer Profile) देखील आवश्यकती सर्व माहिती नोंदवून तात्काळ अद्यावत करावी, या संदर्भात कोणत्याही स्वरुपाचे सहकार्य अथवा युजर आयडी/पासवर्ड याबाबत माहिती आवश्यक असल्यास याकार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर – ०२१४१-२२२०२९ अथवा या कार्यालयाचे लिपिक-टंकलेखक श्री. म.भा.वखरे, यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९४२१६१३७५७ वर संपर्क साधावा.

००००००

संबंधित पोस्ट

ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती जालनाच्या वतीने खालील मागण्या बाबत माननीय श्री चंद्रमोहन चिंतन साहेब उपदेशक परिवहन अधिकारी जालना यांना निवेदन सादर

जिल्ह्यातील शोध व बचाव पथकांचे काटेपूर्णा प्रकल्प येथे प्रशिक्षण राज्य पथकाच्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन..

बीड जिल्ह्यातील हत्याकांड – सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड पुणे पोलिसांच्या ताब्यात सीआयडीला शरण, बीड पोलिसांच्या ताब्यात.

vishwatmaklokswamivarta

डॉ. पंजाबराव देशमुख कॉलेज ऑफ लॉ येथे सरन्यायाधीशन्यायमूर्ती भूषण गवई यांचा सत्कार सोहळा संपन्न

पश्चिम बंगालमध्ये भाजपची मोठी मुसंडी! भाजप २०० पार…

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित तेवीस जिल्ह्यातील ३३ लाखापेक्षा जास्त्‍ शेतकऱ्यांना ३ हजार २५८ कोटीची मदत वितरणास मान्यता मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील• मागील सात दिवसात सुमारे पाच हजार कोटींवर मदत• यंदाच्या खरीप हंगामातील नुकसानीपोटी आतापर्यंत सात हजार ५०० कोटीची मदत…

vishwatmaklokswamivarta