vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांचा आढावा

जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांचा आढावा

अमरावती, प्रतिनिधी : जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. या निवेदनांवर झालेल्या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आज विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते

जिल्ह्यात प्रामुख्याने आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यात येवदा, वडनेर गंगा येथे आरोग्य सुविधांसाठी यंत्रणांनी पुढाकार घेऊन कार्य करावे. तसेच रूग्णांच्या तपासण्यांसाठी सॅम्पल अमरावती येथे पाठवावे लागते. त्यामुळे रूग्णांची अडचण होते. त्यामुळे या सुविधा निर्माण करण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी सकारात्मकतेने काम करावे. दर्यापूर तालुका अल्पसंख्याकमध्ये येत असल्याने त्यांच्यासाठी असलेल्या योजनांमधून आरोग्य विषयक सुविधा उभारण्यावर भर द्यावा. तसेच ग्रामीण रूग्णालय स्थापन करण्यासाठी जागांचा शोध घेण्यात यावा. गरजूंना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आयुष्मान कार्ड काढण्यासाठी विशेष मोहिम घेण्यात यावी.

वन विभागातर्फे नमो उद्यान आणि वड उद्यान तयार करण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. ही उद्याने तातडीने पूर्ण व्हावीत, यासाठी प्रयत्न करण्यात यावे. तसेच ही उद्याने तयार करताना याठिकाणी झाडांची संख्या अधिक असावी. तसेच अतिक्रमणाचा प्रश्न समोर येत आहे. त्यामुळे नगरपालिकांच्या पुढाकाराने शहरातील अतिक्रमणे काढण्यात यावीत. तसेच सर्वांना घरे ही शासनाची भूमिका असल्याने पट्टेवाटप करण्यात यावे. खेलो इंडियामध्ये प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे 14 प्रस्ताव पाठविण्यात यावे. तसेच यावली शहिद येथील शहिद स्मारकासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे.

00000

संबंधित पोस्ट

रेणापूर शहर मंडळ भाजपा किसान मोर्चा ओबीसी मोर्चा कार्यकारिणी जाहीर,हारवाडी गावचे उपसरपंच श्री. किरणजी इंगळे यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश…

vishwatmaklokswamivarta

सेसफंड योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडून 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta

जातीय विषमते विरोधात लढणारे पत्रकार भाई छोटू कांबळे यांचा सत्कार

फलटण तालुक्यात पशुपालकांच्या दारात भ्रूण प्रत्यारोपण योजनेचा शुभारंभ

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 महत्वकांक्षी योजना.सप्टेंबर २०२५ पर्यंत ५००० मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..

आरसेटीच्या वार्षिक प्रशिक्षणाचा कार्यक्रम जाहिर