vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मतदान केंद्रांवर 11 व 12 एप्रिल रोजी विशेष मॅपिंग शिबिर;महापौरांचे नागरिकांना सहकार्याचे आवाहन

मतदान केंद्रांवर 11 व 12 एप्रिल रोजी विशेष मॅपिंग शिबिर;महापौरांचे नागरिकांना सहकार्याचे आवाहन

 

     अमरावती, प्रतिनिधी अमरावती मतदारसंघातील मतदार नोंदणी आणि ‘एस आय आर’ (SIR) मॅपिंगच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी आज तहसील कार्यालय येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला महापौर श्रीचंद तेजवानी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महापौरांनी सर्व नगरसेवक आणि बीएलओ सुपरवायझर यांना मतदारांच्या समस्या सोडवून मॅपिंग प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

महाराष्ट्रामध्ये अद्याप मुख्य ‘एस आय आर’ प्रोग्राम सुरू झाला नसून सध्या केवळ प्री-मॅपिंगचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये किंवा त्रस्त होऊ नये. मतदारांनी आपल्या भागातील बीएलओशी संपर्क साधून ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. ज्या प्रभागांमध्ये मॅपिंगची टक्केवारी कमी आहे, तेथील लोकप्रतिनिधी आणि सुपरवायझर यांना अधिक सक्रिय होण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

दर्यापूरचे उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मॅपिंगच्या कामाला गती देण्यासाठी येत्या 11 आणि 12 एप्रिल रोजी सर्व मतदान केंद्रांवर ‘विशेष कॅम्प’ आयोजित करण्यात आले आहेत. या कॅम्पची मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी करून नागरिकांना सहभागी करून घ्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. मतदारांनी घाबरून न जाता या दोन दिवसांच्या शिबिरात आपले नाव आणि मॅपिंगची खातरजमा करून घ्यावी, असेही ते म्हणाले.

या बैठकीला अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे, नायब तहसीलदार सुनील रासेकर, राजेश धवणे (निवडणूक विभाग), कृष्णा गाडेकर, महसूल सहाय्यक भारत कांबळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नगरसेवकांनी बीएलओंच्या कामात पूर्णतः सहाय्य करावे, जेणेकरून मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत होईल, असा विश्वास महापौर श्री. तेजवानी यावेळी व्यक्त केला.

00000

संबंधित पोस्ट

बीड-परळी रेल्वेमार्गासाठी उर्वरित भूसंपादन प्रक्रियेला गती द्यावी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश महत्वाच्या विकास प्रकल्पांचा घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

जालना शहरतील गुंडगिरीचा बिमोड करण्यासाठी त्यांना संरक्षण देणाऱ्यांचीही नावे जाहीर करा – संपर्कप्रमुख भास्करराव अंबेकर

राष्ट्रीय लोकअदालत मध्ये 1817 वादपूर्व प्रकरणे निकालीएकूण वीस कोटी अडोतीस लाख दहा हजार पाचशे तेहतीस रुपयांची वसुली..

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्रातील संजीवनी सैनिक स्कूल आणि डॉन बॉस्को हायस्कूलची निवड

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची अधिकृत घोषणा मुंबईचा महापौर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा असेल आणि तो निर्विवादपणे मराठीच असणार ..!

vishwatmaklokswamivarta

गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह मिरज येथे प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन