vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कोयना दौलत डोंगरी महोत्सवाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला-सव्वा कोटीहून अधिकची आर्थिक उलाढाल    – पालकमंत्री शंभूराज देसाई

कोयना दौलत डोंगरी महोत्सवाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला-सव्वा कोटीहून अधिकची आर्थिक उलाढाल    – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा प्रतिनिधी : सहयाद्रीच्या कुशीत वसलेल्या सातारा जिल्हयातील निसर्गसंपन्न पर्यटन स्थळांना राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अधिक ठळक स्थान मिळावे या हेतूने कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे आयोजन दौलतनगर, मरळी, ता. पाटण करण्यात आले होते. 2 ते 9 एप्रिल दरम्यान झालेल्या महोत्सवाला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून या महोत्सवात सव्वा कोटी पेक्षा जास्त आर्थिक उलाढाल झाली आहे, अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

या नऊ दिवसीय महोत्सवात बोटीग, घोडेस्वारी, पॅराग्लायडीग, घोडा व उंट सफारी, इलेक्ट्रिकल बग्गी राईड, कार्निवल परेड, खादयजत्रा, कृषी व पशु पक्षी प्रदर्शन, शस्त्र प्रदर्शन, महिला बचत गटांच्या वस्तूंची विक्री दालने ड्रोन शो इ. उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोयना – दौलत डोंगरी महोत्सवास पर्यटकांनी दिलेला प्रतिसाद व स्थानिक जनतेची मागणी विचारात घेऊन सदर महोत्सवास दि. ७ एप्रिल ते दि. ९ एप्रिल २०२६ या कालावधीची वाढ करण्याची घोषणा केली.वाढीव तीन दिवसाच्या कालावधीत बोटींग, पॅराग्लायडींग, फनफेअर, खादयजत्रा इ. उपक्रमांसहीत दि. ७ एप्रिल, २०२६ रोजी भक्ती गीते व भावगीतांचा “स्वर दौलत संध्या” कार्यक्रम. ८ एप्रिल, २०२६ रोजी “द फोक लोक” हा मराठी लोककला आधारीत कार्यक्रम व ९ एप्रिल, २०२६ रोजी अवधूत गुप्ते लाईव संगीत मैफील व मानसी नाईक, योगीता चव्हाण, पूर्वा शिंदे, कविता राव यांचा नृत्यविष्काराचा कार्यक्रम रंगला. तसेच, शानदार “ फायर शो” यांचेही आयोजन करण्यात आले होते.

२ एप्रिल ते ९ एप्रिल, २०२६ अशा एकूण ८ दिवसीय कोयना दौलत डोंगरी महोत्सव – २०२६च्या आयोजनास सुमारे दोन लाखांपेक्षा जास्त पर्यटकांनी भेट दिली, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

0000

संबंधित पोस्ट

नवीन वर्षाच्या निमित्ताने वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ..

vishwatmaklokswamivarta

महिला व बालविका स मंत्री कु.आदिती तटकरे यांच्याहस्ते १ मे रोजी मुख्य शासकीय ध्वजवंदन

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने आज आपल्या एअरसाइड कामकाजाची सुरुवात पहिल्या व्यावसायिक विमानाचे आगमन,पारंपरिक वॉटर कॅनन सॅल्यूट देऊन सन्मानित

vishwatmaklokswamivarta

आपले सरकार” पोर्टलच्या माध्यमातून देणात येणाऱ्या सेवाआता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे घेणार विभागाचा आढावा नागरिकांसोबत साधणार संवाद..

vishwatmaklokswamivarta

अहिल्यानगरसाठी मोठा निर्णय – साकळाई उपसा सिंचन योजनेला मंजुरी ₹१,२३४ कोटींच्या तरतुदीस मान्यता..