vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

औषध विक्रेता बंदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहिर

औषध विक्रेता बंदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहिर

      अमरावती, प्रतिनिधी : अखिल भारतीय औषधी विजेता संघटनेच्या वतीने बुधवार, दि. 20 मे रोजी देशव्यापी एक दिवसीय औषधविक्री बंदची घोषणा करण्यात आली आहे. या बंदमुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने हेल्पलाईन क्रमांक जाहिर केले आहे.

 बंदच्या काळात जिल्ह्यातील नागरिकांनी अत्यावश्यक औषधांचा पुरवठा अखंडीत व सुरळीत उपलब्ध राहावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केली आहे. सहआयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासन यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते, रुग्णालयांशी संलग्र औषध दुकाने, तसेच 24 तास सुरु असणाऱ्या औषध दुकानांनी समन्वय साधण्यात येत आहे. यात अत्यावश्यक औषधांचा पुरवठा खंडित होणार नाही यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आले आहेत.

    नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच औषधांचा अनावश्यक साठा करू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. औषध उपलब्धतेबाबत कोणतीही अडचण उद्भवल्यास नागरिकांनी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले ओ. अन व औषध प्रशासन, अमरावती कार्यालया हेल्पलाईन क्रमांक – गजानन घीरके, सहायक आयुक्त (औषधे) वाशिम, अमरावती-९८५०१५०६८७, मनिष गोतमारे, औषध निरीक्षक, वाशिम, अमरावती ९५५२५७४४९५, तालुकानिहाय आपत्कालीन औषध उपलब्धता हेल्पन्नाईन क्रमांक – अमरावती शहर – प्रविण देशमुख 9422158409, संजय बोबडे 9422157615, सौरभ मालानी 9423812345, मनोज डफळे 9823205250, राजा नानवाणी 9822643226 येथे संपर्क साधावा, असे आवाहन सह आयुक्त (औषधे) करण्यात मि. कृ. काळेश्वरकर यांनी केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

इयत्ता बारावी परीक्षेला आज मंगळवारपासून सुरुवात; कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रशासन सज्ज,विद्यार्थ्यांनी दडपण न बाळगता सकारात्मकपणे परीक्षेला सामोरे जावे-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

vishwatmaklokswamivarta

मुंबईकरांसाठी खुशखबर – दिवाळीत म्हाडाच्या घरांची विक्री – प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर अर्ज सुरू

vishwatmaklokswamivarta

जप्त व बेवारस वाहनांचा १२ एप्रिल रोजी लिलाव

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते 61,125 कोटी रु जिल्हा पतपुरवठा पुस्तिकेचे अनावरण- पीक कर्जाची मार्चअखेर 100 टक्के उद्दिष्टपूर्ती करा–जिल्हाधिकारी किशन जावळे

नमुंमपा निवडणूकीसाठी ईव्हीएम यंत्रणा सज्ज – आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केली पाहणी…

vishwatmaklokswamivarta

वसतिगृह प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांनी आधार, स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन; ऑनलाईन अर्ज 18 सप्टेंबरपर्यंत मागविले