vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

 नांदेड प्रतिनिधी :- नांदेड जिल्ह्यात 12 एप्रिल चे सकाळी 6 वाजेपासून ते 26 एप्रिल 2026 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 12 एप्रिलचे सकाळी 6 वाजेपासून ते 26 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

संबंधित पोस्ट

ज्येष्ठ नागरिकांसाठी मालमत्ता करात सवलत’ हा समाज माध्यमांवरून प्रसारित होणारा संदेश फसवणूकीचा असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता फसवणूक टाळण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

चिपी – मुंबई विमानसेवा तातडीने सुरू करण्यासाठीच्या परवाने आणि प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा- मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

खरीप हंगामाची पेरणी सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना बियाणे, खते व पीक कर्ज, उपलब्ध करुन द्या  – पालकमंत्री पंकजा मुंडे• जिल्ह्यात खरीप हंगामात 6 लाख 29 हजार हेक्टरवर होणार पेरणी..

vishwatmaklokswamivarta

विधान परिषद प्रश्नोत्तरे-नदी किनारी पूर रेषेसंदर्भात असलेल्या ब्ल्यू लाईनबाबत पुन्हा सर्वेक्षण- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आरोग्य विभागाचा आढावा;कार्यतत्पर राहून आरोग्य यंत्रणेने काम करावे – डॉ. किरण पाटील

vishwatmaklokswamivarta

मुंबईत ₹122 कोटींची बँक फसवणूक – बँकेच्या महाव्यवस्थापकावर गुन्हा दाखल!

vishwatmaklokswamivarta