vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते लखनौ छावणीतील स्मृतिका युद्ध स्मारक येथे अत्याधुनिक लेझर, लाईट आणि साऊंड शोचे उद्घाटन

संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते लखनौ छावणीतील स्मृतिका युद्ध स्मारक येथे अत्याधुनिक लेझर, लाईट आणि साऊंड शोचे उद्घाटन

राज्य प्रतिनिधी-संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते लखनौ छावणीतील स्मृतिका युद्ध स्मारक येथे अत्याधुनिक लेझर, लाईट आणि साऊंड शोचे उद्घाटन केले आहे

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी  उत्तर प्रदेशातील लखनौ छावणीतील स्मृतिका युद्ध स्मारक येथे  एका अत्याधुनिक लेझर, लाईट आणि साऊंड शोचे उद्घाटन केले. सुमारे 30 मिनिटांच्या या हिंदीमधील  मल्टीमीडिया शोमध्ये, प्रगत प्रोजेक्शन, ध्वनी आणि प्रकाश तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतीय लष्कराचा इतिहास, परिचालन उपलब्धी आणि राष्ट्र उभारणीतील योगदानाची माहिती देण्यात आली.  हा शो स्मृतिका युद्ध स्मारक येथे  दररोज संध्याकाळी आयोजित केला जाईल आणि लवकरच तो जनतेसाठी खुला केला जाईल.मल्टीमीडिया सादरीकरणात भारताच्या प्रमुख युद्धांचा आढावा देण्यात आला असून विशेषतः 1947-48, 1962, 1965 आणि 1971 च्या युद्धांमधील प्रमुख परिचालन बाबी तसेच ऑपरेशन मेघदूत आणि ऑपरेशन विजय दरम्यानचे अतुलनीय योगदान अधोरेखित करण्यात आले. या कार्यक्रमात विविध मोहिमांमधील मध्यवर्ती कमांडची महत्त्वपूर्ण भूमिका ठळकपणे दाखवण्यात आली. याव्यतिरिक्त, अवध प्रदेशातील परमवीर चक्र मानकऱ्यांचे अतुलनीय शौर्य देखील अधोरेखित करण्यात आले. तसेच अवधच्या खोलवर रुजलेल्या लढाऊ परंपरा आणि राष्ट्राच्या संरक्षणातील त्याच्या उल्लेखनीय योगदानाचा संक्षिप्त आढावाही सादर करण्यात आला.नवीन उद्भवणारे धोके आणि युद्धाच्या बदलत्या स्वरूपाला प्रतिसाद म्हणून भारतीय लष्कराचे करण्यात आलेले सातत्यपूर्ण आधुनिकीकरण आणि परिवर्तन यांचाही या शो मध्ये समावेश होता.

भारतीय संरक्षण उद्योगातील अलिकडच्या प्रगतीवर विशेष भर देण्यात आला. ज्याचा वापर प्रथमच ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान करण्यात आला होता. तसेच, ‘आत्मनिर्भरता’ उपक्रमांचे केंद्र म्हणून उत्तर प्रदेशचा झालेला उदय , ज्याचे ठळक उदाहरण म्हणजे राज्याचा संरक्षण कॉरिडॉर आहे.

 

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री संत शिरोमणी नामदेव महाराज पायरीचे दर्शनसंत नामदेव महाराजांची पायरी येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरती..मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे, श्री संत चोखामेळा समाधीचे घेतले दर्शन..

टॅक्सी, ऑटो रिक्षा प्रवासी वाहनांची वयोमर्यादा निश्चित

फौजदारी प्रकरणातील कार्यवाहीबाबत महसूल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण स्तुत्य – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,मराठा समाजाच्या विविध विषयांच्या अनुषंगाने मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला आढावा..

नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना-नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आवश्यक दुरुस्ती व देखभाल कामांमुळे काही विभागांमध्ये साप्ताहिक पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेले- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनमहाराष्ट्र नायक कॉफी टेबल बुकचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन