vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड गेली आहे. मी आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण -सुनेत्राताई अजित पवार उपमुख्यमंत्री

ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड गेली आहे. मी आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण -सुनेत्राताई अजित पवार उपमुख्यमंत्री

राज्य प्रतिनिधी-ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड गेली आहे. मी आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण -सुनेत्राताई अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी आपल्या ट्विटर अकाउंट यक्स वर म्हटले आहे

आशाताई भोसले यांच्या आवाजात विलक्षण माधुर्य, विविधता आणि भावनांची अप्रतिम अभिव्यक्ती होती. हिंदी, मराठीसह विविध भारतीय भाषांमधील हजारो गाण्यांमधून त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ‘पिया तू अब तो आजा’, ‘दम मारो दम’, ‘इन आंखों की मस्ती’, ‘चुरा लिया है तुमने’ यांसारखी असंख्य गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. त्यांच्या गायकीत आधुनिकतेसोबतच पारंपरिकतेचा सुंदर संगम दिसून येतो.

आशाताई भोसले यांचा संगीत प्रवास म्हणजे कठोर परिश्रम, सातत्य आणि कलेप्रति असलेल्या निष्ठेचे प्रतीक आहे. त्यांनी अनेक पिढ्यांतील श्रोत्यांना आपल्या सुरांनी मंत्रमुग्ध केले. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीतसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. आपल्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीत आशाताई भोसले यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. आपल्या कर्तृत्वाने संगीत क्षेत्रात त्यांनी मानाचे स्थान निर्माण केले. त्यांच्या अद्वितीय योगदानामुळे त्यांना जागतिक स्तरावरही विशेष ओळख मिळाली होती. आशाताईंच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना झालेले हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करते.

संबंधित पोस्ट

संतानी पर्यावरणपूरक जीवनाचा संदेश दिला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ उपक्रमाचा समारोप

जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचे उद्घाटन

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमआरोग्य अभियानांमध्ये सर्व घटकांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी स्वामी,२४ ग्रामपंचायतींना रजत तर ३०४ ग्रामपंचायतींना कास्य पदक सन्मान..

महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वतयारीचा कोकण विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील कांजूरमार्ग कचरा डेपोसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली बैठक. 

सांगली जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचीसमता पंधरवडा कालावधीत विशेष मोहीम..