vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या साथीने  सोनिया चौगुलेंच्या कार्वी ब्रँडची यशस्वी वाटचाल

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या साथीने  सोनिया चौगुलेंच्या कार्वी ब्रँडची यशस्वी वाटचाल

सांगली, प्रतिनिधी – ऊसपट्टा, द्राक्षपट्टा अशी ओळख असणाऱ्या पलूस तालुक्यात दूध व दुग्धजन्य पदार्थ व्यावसायिकांची संख्या वाढत आहे. शासकीय योजनांचा लाभ घेऊन प्रगती साधणाऱ्या कार्वी ब्रँडची ही यशोगाथा.

कोविडच्या आव्हानाच्या काळात सोनिया प्रशांत चौगुले यांनी कार्वी या ब्रँडने दूध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादन व्यवसाय सुरू केला. लग्नापूर्वी घेतलेल्या फूड टेक्नॉलॉजीच्या शिक्षणाच्या पायावर व मेहनतीच्या जोरावर त्यांच्या व्यवसायाची यशस्वी वाटचाल सुरू आहे.

सोनिया चौगुले यांचे माहेर कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूड तालुक्यातील नेज हे असून, त्यांचे वडील शिक्षक होते. 2004 साली त्यांनी बी. एस्सी फूड टेक्नॉलॉजीचे शिक्षण पूर्ण केले. भिलवडी येथील प्रशांत चौगुले यांच्याशी 15 वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला. पती प्रशांत चौगुले औद्योगिक कंपन्यांच्या एअर कूलिंग यंत्रांसदर्भात काम करतात. प्रापंचिक जबाबदारी पार पाडताना सोनिया यांना स्वतःचा व्यवसाय असावा, असे नेहमी वाटे. त्यामुळे प्रशांत चौगुले यांच्या भक्कम साथीतून सोनिया यांनी प्रक्रिया उद्योगाची माहिती घेतली. स्वतःचे फूड टेक्नॉलॉजीचे शिक्षण, पतींची साथ व कुटुंबियांच्या प्रोत्साहनातून सोनिया यांनी कार्वी या ब्रँडने दूध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादन व्यवसाय सुरू केला.

याबाबत सोनिया चौगुले म्हणाल्या, 2019 साली कोविडच्या आव्हानाच्या काळात आमच्या व्यवसायाची मुहुर्तमेढ आम्ही रोवली. त्यापूर्वी जिल्हा उद्योग केंद्रांशी संपर्क साधून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची माहिती घेतली. व्यवस्थित अभ्यास करून रक्कम रूपये 50 लाखांच्या कर्जमागणीचा प्रस्ताव आम्ही जिल्हा उद्योग केंद्राकडे सादर केला. त्यानंतर अग्रणी बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेल्या सहकार्यामुळे आम्हाला वेळेत कर्ज मिळण्यासाठी मदत झाली. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून प्रस्ताव केल्याने 35 टक्के अनुदानही मिळाले, याबद्दल त्या राज्य शासनाचे तसेच जिल्हा उद्योग केंद्र व बँकेच्या अधिकाऱ्यांचे ऋणनिर्देश व्यक्त करतात.

भिलवडीजवळ माळवाडी येथे अडीच गुंठ्यामध्ये सोनिया चौगुले यांच्या कार्वी ब्रँडचे युनिट सुरू आहे. मिळालेल्या कर्जातून चौगुले यांनी कोल्हापूर, सांगली येथून आवश्यक यंत्रे खरेदी केली. सध्या त्यांच्या युनिटमध्ये पाश्चरायझेशन यंत्र, खवा निर्मिती यंत्र, प्लॅनेटरी मिक्सर, चक्का श्रेडींग मिक्सर, बल्क कूलर, दूध पॅकिंग यंत्रणा, प्रयोगशाळा असून, जवळपास चार हजार लिटर्स क्षमतेचे कोल्ड स्टोरेज आहे. त्यांच्याकडे जवळपास 10 कामगार आहेत. युनिटमध्ये रोज 1200 लिटर्सचे दूध हँडलिंग केले जाते. त्यासाठी आवश्यकतेप्रमाणे दोन दूध संकलन केंद्रांमधून दुधाची खरेदी केली जाते.

कार्वी ब्रँडखाली दूध, दही, ताक, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, पनीर आदि गुणवत्तापूर्ण उत्पादने तयार केली जातात. सुरवातीला आलेल्या अडचणींवर जिद्द व चिकाटीच्या जोरावर चौगुले दांपत्याने यशस्वी मात केली. सध्या त्यांची उत्पादनांना चांगली मागणी असून, सांगली, मिरज, पलूस, तासगाव या ठिकाणी त्यांच्या उत्पादनांचा पुरवठा केला जातो.

00000

संबंधित पोस्ट

मारवाडी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या शितला माता मंदिर परिसर स्वच्छता करा-विकासकुमार बागडी..

लोकशाहीच्या या उत्सवात नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये मतदारराजानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि आमच्या कार्यक्षम, विकासाभिमुख उमेदवारांवर जो ठाम विश्वास दाखवला आहे, तो आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि जबाबदारीचा क्षण आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; एकदा जमीन विकली काय म्हणाले राज ठाकरे? भाषा संपली तर… रायगडवासियांना राज ठाकरेंचं आवाहन

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘इंडिया मेरीटाईम वीक-२०२५’ मध्ये५५ हजार ९६९ कोटी रुपयांचे १५ सामंजस्य करार सागरी व्यापार आणि उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

17 नोव्हेंबरला महिला लोकशाही दिनाचे आयोजन 

vishwatmaklokswamivarta

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अधिनस्त सात गाळे भाडे तत्वावर देण्यात येणार§ माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरपत्नी यांना संधी§ अर्ज करण्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंतची मुदत..

vishwatmaklokswamivarta