vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञान

सक्षम उद्योजक बनवण्यावर भरअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम…

सक्षम उद्योजक बनवण्यावर भरअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम…

मुंबई, प्रतिनिधी: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ केवळ आर्थिक सहाय्य देण्यापुरते मर्यादित न राहता लाभार्थ्यांना सक्षम उद्योजक बनविण्यावर विशेष भर देत आहे. यासाठी डिजिटल प्रशिक्षण उपक्रम, मार्केटिंग टॅब सारख्या आधुनिक सुविधा आणि कागदपत्र पडताळणीतील तांत्रिक सुधारणा राबवून व्यवसाय वृद्धीसाठी सर्वंकष पाठबळ दिले जात आहे. या उपक्रमांद्वारे लाभार्थ्यांना केवळ आर्थिक मदत नव्हे, तर ज्ञान, कौशल्ये आणि बाजारपेठेची जोड देऊन त्यांना सक्षम उद्योजक बनविण्याचा प्रयत्न महामंडळाद्वारे करण्यात येत आहे. जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी केले आहे.

डिजिटल बाजारपेठेची दारे उघडलीमहामंडळाने आपल्या अधिकृत पोर्टलवर ‘व्यवसाय वर्धन मार्केटिंग टॅब’ विकसित केला असून तो ‍फ्लिपकार्ट, ॲमेझॉन आणि इंडिया मार्ट यांच्या धर्तीवर तयार करण्यात आला आहे. या प्लॅटफॉर्मवर लाभार्थ्यांना त्यांच्या उत्पादनांची माहिती, छायाचित्रे, किंमत, संपर्क तपशील व व्यवसायाचा पत्ता अपलोड करता येतो. लहान व्यवसायांनाही महामंडळाच्या पोर्टलमार्फत व्यवसायाची संधी उपलब्ध करुन दिली आहे.

२७,५०० हून अधिक व्यवसायांची नोंदसध्या या प्लॅटफॉर्मवर २७,५०० हून अधिक व्यवसायांची नोंद झाली आहे. व्यवसाय श्रेणी, उपश्रेणी, महसुली विभाग, जिल्हा व तालुका अशा विविध निकषांवर शोध सुविधा उपलब्ध असल्याने नागरिकांना नजिकच्या लाभार्थ्यांची माहिती सहज मिळते आणि त्यांच्या उत्पादनांचा थेट लाभ घेता येतो. या उपक्रमातून ‘लोकल ते ग्लोबल’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न होत असून लघुउद्योजकांना मोठ्या बाजारपेठेत प्रवेशाची संधी मिळत आहे. भविष्यात लाभार्थ्यांच्या मागणीनुसार पेमंट गेटवे सुरू करण्याचेही नियोजन आहे.

डिजिटल प्रशिक्षणातून कौशल्यवृद्धी महामंडळाने वेबिनार, यूट्युब, आणि पॉडकास्टच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले आहेत. व्यवसाय सुरू करण्यापासून ते वाढविण्यापर्यंतची प्रक्रिया, उत्पादनाची गुणवत्ता व ब्रँडिंग, डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडियाचा वापर, ग्राहक संवाद, विक्री कौशल्ये आणि आर्थिक नियोजन यासारख्या विषयांवर मार्गदर्शन केले जाते. तज्ञ व्यक्तींमार्फत तांत्रिक माहिती उपलब्ध करून दिली जाते. तसेच प्रशिक्षणांचे व्हिडिओ महामंडळाच्या अधिकृत यूट्युब चॅनेलवर व फेसबुकवर उपलब्ध असल्याने लाभार्थ्यांना त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार शिक्षण घेता येते. ग्रामीण व दुर्गम भागातील उद्योजकांसाठी ही सुविधा विशेष उपयुक्त ठरत आहे.

कागदपत्र पडताळणी सुलभ; डिजीलॉकर सेवामहामंडळाने डिजीलॉकर सेवा आपल्या प्रणालीमध्ये समाविष्ट केल्यामुळे कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया अधिक सुलभ, वेगवान व विश्वासार्ह झाली आहे. पुढील टप्प्यात महा-आयडी आणि आधार यांचे एकत्रीकरण करण्याची कार्यवाही प्रस्तावित आहे.

व्यवसाय वर्धन सुविधेचा लाभ घेण्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी पोर्टलवर नोंदणी करून आपल्या उत्पादनांची माहिती अपलोड करावी, तसेच आवश्यकतेनुसार जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

सरकार ऑनलाइन गेमिंग नियम २०२५ च्या प्रचार आणि नियमावलीवर नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. याबाबतची माहिती

डिजिटल जनगणना 2027′ च्या तयारीला वेग; जिल्हास्तरीय क्षेत्रीय प्रशिक्षण संपन्न-जनगणनेचे कार्य अचूकपणे पूर्ण करा- डॉ. प्रवीणकुमार देवरे

माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार- माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

ज्वेल्स ऑफ नवी मुंबई, नेरूळ येथील सार्वजनिक ई व्ही चार्जींग स्टेशन जनतेसाठी खुले…

ऑनलाईन प्लॅटफॉर्म, गिग आणि डिलिव्हरी क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची कसून पडताळणी करणे आवश्यककामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे आदेश ग्राहक सुरक्षितता केंद्रस्थानी ठेवून सर्वसमावेशक आराखडा तयार करावा*कामगार आणि गृह विभागाची संयुक्त बैठक

नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांसाठी ‘सी-ट्रिपल आयटी’ मंजूर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराला टाटा टेक्नॉलॉजीचा सकारात्मक प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta