vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जमीन आरोग्य व्यवस्थापनासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन आवश्यक :डॉ संग्राम काळे*

*जमीन आरोग्य व्यवस्थापनासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन आवश्यक :डॉ संग्राम काळे*

सातारा, प्रतिनिधी: रासायनिक खतांचे असमतोल वापरामुळे जमीन आरोग्यावर होणारे परिणाम लक्षात घेऊन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या सूचनेनुसार येत्या खरीप हंगामात रासायनिक खतांचा वापर कमी करून पर्यायी खतांचा शेतकऱ्यांनी अवलंब करण्यासाठी जनजागृती कार्यक्रम कृषि विज्ञान केंद्र बोरगाव व महाराष्ट्र शासन कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे शेळकेवाळी ता. सातारा येथे राबविण्यात आले.

या जनजागृती कार्यक्रमला कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज चे मृदा शास्त्रज्ञ डॉ. संग्राम काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. काळे यांनी माती परीक्षणसाठी नमुने गोळा करण्यासंदर्भात कृती करून दाखविले. ते म्हणाले, हंगामात रासायनिक खतांचा संतुलित वापर होण्यासाठी पिकांच्या अन्नद्रव्यांसाठी केवळ रासायनिक खतांवरच अवलंबून न राहता जमिनीत जास्तीत जास्त सेंद्रिय खते, शेणखत, कंपोस्ट, गांडूळखत, नाडेप खत व हिरवळीचे खत वापरणे आवश्यक आहे. त्यामुळे जमिनीच्या भौतिक व जैविक गुणधर्मात सुधारणा होते. अन्नद्रव्यांची उपलब्धता व उपयुक्तता वाढते. रायझोबियम, अझोटोबॅक्टर, पीएसबी व केएसएम यासारखे जिवाणू संवर्धक किंवा जिवाणू संघ प्रत्येक पिकात शिफारशीप्रमाणे बीजप्रक्रियेसाठी वापरल्यास रासायनिक खतांच्या वापरात बचत होते, असेही डॉ. काळे म्हणाले.

 पिकांना आवश्यक अन्नद्रव्याची गरज भागविण्यासाठी खतांची बाजारातील उपलब्धता, सद्य:स्थितीतील किमतीनुसार येणारा खर्च, कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार खतमात्रा आदी बाबींचा विचार करावा तसेच माती परीक्षणानुसार किंवा जमीन सुपीकता निर्देशांकानुसार खतांचा वापर केल्यास शेतकऱ्यांना फायदा होतो , असेही डॉ. काळे यांनी सांगितले

या कार्यक्रमा प्रसंगी किन्वित सेंद्रिय खत प्रकल्पाअंतर्गत ऊस पिकाच्या प्रात्यक्षिक प्रशेत्रावर शिवार फेरी आयोजित करण्यात आली.या प्रसंगी ऊस पिकातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

भूषण यादगीरवार यांनी प्रकल्प विषयी माहिती देताना सांगितले की भारत सरकारच्या गोबरधन योजनेअंतर्गत मोजे शेळकेवाळी येथे ऊस पिकात दहा शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले आहे.धनाजी फडतरे यांनी घणजीवामृत तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.स्वागत प्रवीण शेळके यांनी केलं व आभार विद्या शेळके यांनी केलं.

0000

संबंधित पोस्ट

महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना स्मारकस्थळी वैचारिक अभिवादन,5 डिसेंबरला डॉ.अजित रानडे यांचे ‘आर्थिक लोकशाही आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ विषयावर व्याख्यान

vishwatmaklokswamivarta

आदर्श राज्याचा वस्तुपाठ छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्यवर्ती संग्रहालयात वाघनखे व शिवशस्त्र दालनाचे उदघाटन,विदर्भातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भेट देण्याचे आवाहन लेझीम, ढोल-ताशे, दिंडी पथकाच्या मिरवणुकीतून मुख्यमंत्र्यांचे स्वागत

vishwatmaklokswamivarta

शिवाजी कोण होता?’ पुस्तकावर बंदीसाठी कोल्हापुरात हिंदुत्वनिष्ठांचे तीव्र आंदोलन!चुकीचा वा धार्मिक भावना दुखावणारा इतिहास मांडणाऱ्या या पुस्तकावर तात्काळ बंदी आणावी या मागणीसाठी समस्त हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन..

vishwatmaklokswamivarta

केदारनाथहून गुप्तकाशीकडे जाणारं हेलिकॉप्टर आज सकाळी सुमारे ५:२० वाजता गौरीकुंडजवळ कोसळले.हेलिकॉप्टरमध्ये ६ प्रवासी (५ प्रौढ, १ बालक) व पायलट होते. हे प्रवासी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात येथील होते.

vishwatmaklokswamivarta

भारतीय सैन्यानं मिळवलेल्या विजयानिमित्त देशभरात साजरा होत आहे कारगिल विजय दिन.

नवी मुंबईतील एमआयडीसी परिसरात भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही.