vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

आलापल्ली वनपरिक्षेत्रात वनविभागाच्या धडक कारवाईत १२ शिकारी ताब्यात वन्यजीव अवयवांसह साहित्य जप्त; कायदेशीर कारवाई सुरू

आलापल्ली वनपरिक्षेत्रात वनविभागाच्या धडक कारवाईत १२ शिकारी ताब्यात वन्यजीव अवयवांसह साहित्य जप्त; कायदेशीर कारवाई सुरू

गडचिरोली, प्रतिनिधी : आलापल्ली वनपरिक्षेत्रात सामूहिक जंगल गस्ती दरम्यान वनविभागाने मोठी कारवाई करत १२ शिकाऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून वन्यजीवांचे अवयव व शिकारीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी भारतीय वन अधिनियम, 1927 तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम, 1972 अंतर्गत गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. . 19 एप्रिल 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास जंगलात काही जण शिकारीसाठी लपून बसल्याची माहिती वनविभागाला प्राप्त झाली. त्यानंतर गस्ती पथकाने तत्काळ परिसरात सापळा रचून पाठलाग केला असता १२ जणांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत शिकाऱ्यांकडून विविध वन्यजीवांचे अवशेष जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या वन्यजीवांमध्ये पारध केलेले चार शेकरू, एक उडनारी खार, एक हरीनाल पक्षी तसेच घुबड प्रजातीतील पक्षी व इतर अवयवांचा समावेश आहे.

सदर कारवाई ही आलापल्लीच्या उपवनसंरक्षक सौ. दिपाली तळमले व उपविभागीय वन अधिकारी श्री. शिवपाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी गोरख गणवीर यांच्या नेतृत्वात पार पडली. या मोहिमेत क्षेत्र सहाय्यक श्री. पुन्नमचंद बुधवार, वनरक्षक श्री. दत्ता सुरवसे, श्री. निलेश टेकाम, श्री. सुधाकर सोयाम, वाहन चालक श्री. सुरेश मडावी, चौकीदार श्री. श्याम जंगमवार, श्री. नामाजी मडावी व श्री. देवाजी सलामे आदी उपस्थित होते.

वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने अशा प्रकारच्या अवैध कृत्यांवर वनविभागाचे सतत लक्ष असून पुढील काळातही कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार आहेत. संशयास्पद हालचालींबाबत नागरिकांनी तात्काळ वनविभागास माहिती देण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी गोरख गणवीर यांनी केले आहे.

००००

संबंधित पोस्ट

नाशिक जिल्ह्यात खळबळजनक  धक्कादायक!बातमी- गावच्या सरपंचानेच केला दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, आरोपी अटक

vishwatmaklokswamivarta

हेरगिरीच्या आरोपाखाली हरियाणामध्ये युट्यूबर ज्योती मल्होत्राला ​​अटक; लष्करी माहिती पाकिस्तानला पाठवल्याचा आरोप..

मुंबईतील देवनारमध्ये अमली पदार्थांचा मोठा पर्दाफाश: दोन दिवसांत ₹19.78 लाख किमतीचा 94.494 किलो गांजा जप्त

vishwatmaklokswamivarta

लाल किल्ला कार बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने दिल्लीतून अमीर रशीद अली नावाच्या काश्मिरी रहिवाशाला अटक

vishwatmaklokswamivarta

बीडमधील हत्येप्रकरणी बातमी; दोन मुख्य आरोपींना अटक, संतोष देशमुखांचं लोकेशन देणाराही ताब्यात..

मुंबईला बॉम्बने उडून देण्याची बॉम्ब हल्ल्याची धमकी देणाऱ्या आरोपीला २४ तासांत अटक

vishwatmaklokswamivarta