vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

केंद्र सरकारच्या आयगॉट- ‘साधना सप्ताह 2026’ मध्ये महाराष्ट्र अव्वल**मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक

केंद्र सरकारच्या आयगॉट- ‘साधना सप्ताह 2026’ मध्ये महाराष्ट्र अव्वल**मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक

मुंबई प्रतिनिधी : केंद्र सरकारच्या ‘मिशन कर्मयोगी’ अंतर्गत आयोजित ‘साधना सप्ताह २०२६ मध्ये राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावत नवा मानदंड प्रस्थापित केला असून या अध्ययन सप्ताहात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील या उपक्रमात सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत, या सर्वांच्या प्रयत्नाचे कौतुक केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्ञानोपासना, क्षमताविकास आणि उत्तम सार्वजनिक सेवा देण्याच्या दृष्टीने मिशन कर्मयोगी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि पाठबळ उपलब्ध करून दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचेही आभार मानले आहेत.

महाराष्ट्रातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी ‘आयगॉट कर्मयोगी’ प्लॅटफॉर्मवर एकूण ४६ लाख ९४ हजार ५९७ अभ्यासक्रम पूर्ण करत ६ लाख ५९ हजार ७५९ एआय-विशिष्ट प्रमाणपत्रे प्राप्त केली आहेत. हे आधुनिक सुशासन आणि क्षमता विकासाबाबत राज्याच्या दृढ वचनबद्धतेचे द्योतक, असल्याचे मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे.

देशभरातील सुमारे ३३ लाख ४ हजार शासकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांनी ‘साधना सप्ताहा’त सहभाग घेत ‘iGOT कर्मयोगी’ प्लॅटफॉर्मवर सुमारे चार तासांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. यामध्ये राज्यातील ५ लाखांहून अधिक अधिकारी – कर्मचारी सहभागी झाले होते. या उपक्रमात महाराष्ट्राने केलेली कामगिरी ही राज्याच्या प्रशासनिक कार्यक्षमतेचा उत्कृष्ट नमुना असल्याचेही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी नमूद केले.

०००००

संबंधित पोस्ट

जि.प. ठाणे अंतर्गत ‘राष्ट्रीय पंचायत राज दिवसानिमित्त विशेष ग्रामसभा व जनजागृती उपक्रमांचे आयोजन..ग्रामसभा व जनजागृती उपक्रमांमध्ये ग्रामस्थांना सहभागी होण्यासाठी जिल्हा परिषदेचे आवाहन..

इंदापूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या न्यायालयाचे उद्घाटन संपन्न,जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय इमारतीच्या बांधकामासाठी अतिरिक्त ८ कोटी रुपयांची तरतूद करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

मोर्शी येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे काम वेळेत पूर्ण करा – मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

पर्यावरणीय दृष्टिकोनातून श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसराचा विकास करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर व परिसर विकास आराखडा शिखर समिती बैठक; १७० कोटींच्या सुधारित विकास आराखड्यास मान्यता

मुंबई महानगरात ॲपच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे बाईक टॅक्सीद्वारे अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याच्या तक्रारी.

गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सांगली व मिरज शहरात वाहनांसाठी मनाई आदेश जारी..