vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

एचआयव्ही बाधीत औषधोपचारांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता- जिल्हाधिकारी संतोष पाटील

एचआयव्ही बाधीत औषधोपचारांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता- जिल्हाधिकारी संतोष पाटील

सातारा द प्रतिनिधी : जिल्ह्यातील एचआयव्ही बाधीत औषधोपचारांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊन बाधीतांचे मृत्युचे प्रमाण कमी करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. या आढावा बैठकीला जिल्हा शिल्यचित्सिक डॉ. राहुल जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलीपे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

 एचआयव्ही बाधीत रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेतल आहे त्यांचीही आकडेवारी घ्यावी, असे निर्देश देऊन जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, लहान मुलांसाठी असणाऱ्या गोवर व रुबेला लसीकरणाची माहीती घ्यावी. माझं गाव आरोग्य संपन्न हे अभियान सुरु आहे. या अभियानात जास्तीत जास्त ग्रामपंचायतींचा सहभाग घ्यावा. अभियानात आपला जिल्हा अग्रेसर राहील असे काम करावे. तसेच आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्रांची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावीत, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिले.

000

संबंधित पोस्ट

जागतिक लोकसंख्या दिन : सुखी जीवनाचा उपाय लोकसंख्या वाढीवर मात .

कर्करुग्ण निदान वाहनाचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव विद्यापीठाच्या सेवेत ’रुग्णवाहिका’दाखल

राज्यातील ९ लाख ८४ हजार पेक्षा अधिक मुलींना गर्भाशयमुख प्रतिबंधासाठी एचपीव्ही लसीकरण जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

आज नांदुरा तालुक्यात महाराजस्व अभियान अंतर्गत सर्व ६ महसुली मंडळांमध्ये प्रत्येक मंडळाच्या एका महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय नमुना पाहणीः कुटुंबांचे आरोग्य सर्व्हेक्षण

vishwatmaklokswamivarta