vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भटक्या कुत्र्यांसाठी डॉग पॉन्ड, शेल्टर उभारण्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पावणेपाच कोटीचा निधी केला मंजूर– महानगरपालिका व 10 नगरपालिका /नगरपंचायत कार्यक्षेत्रात श्वान निवारा केंद्र उभारण्यात येणार

भटक्या कुत्र्यांसाठी डॉग पॉन्ड, शेल्टर उभारण्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पावणेपाच कोटीचा निधी केला मंजूर– महानगरपालिका व 10 नगरपालिका /नगरपंचायत कार्यक्षेत्रात श्वान निवारा केंद्र उभारण्यात येणार

        सांगली, प्रतिनिधी : मा. सर्वोच्च न्यायालयाने भटक्या श्वानांच्या संदर्भात वेळोवेळी दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमिवर भटक्या श्वानांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकासह जिल्ह्यात 10 नगरपालिका व नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये श्वान निवारा केंद्र उभारणीसाठी 4 कोटी 74 लाख 86 हजार 620 रूपयांचा निधी पालकमंत्री चंदकांत पाटील यांनी मंजूर केला आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेतून या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

       या उपक्रमांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणांसाठी निवारा, निर्बीजीकरण आणि रेबीज प्रतिबंधक या उपाययोजना करण्यात येणार आहेत. यामध्ये महापालिका क्षेत्रासाठी 2 कोटी 51 लाख 86 हजार रूपये व जिल्ह्यातील एकूण 10 नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी 2 कोटी 23 लाख 6 हजार रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचे डॉग शेल्न्टर उभे केले जाणार आहे. डॉग शेल्टरच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया एक महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हास्तरीय प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.

या निवारा केंद्राच्या निर्माणामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांची समस्या कमी होण्यास मदत होईल. केंद्राच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांना आश्रय मिळणार असून, त्यांची देखभाल आणि उपचार देखील केले जाणार आहेत.

00000

 

संबंधित पोस्ट

नैसर्गिक आपत्तींचा सामना प्रभावीपणे करण्यासाठी  संबंधित विभागांनी तातडीने उपाययोजना राबवाव्यात – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्यासाठी युवक व युवतींनीऑनलाईन अर्ज सादर करावेत

vishwatmaklokswamivarta

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आयोगाची तयारी सुरू; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

मुलांना आळशी बनवू नका, मुलांना प्रयत्नशील बनवा- प्रा.डॉ. गणेशजी अग्निहोत्री श्री एम.एस. जैन इंग्लिश स्कूल मध्ये “भारत कल, आज और कल” वार्षिक स्नेहसंम्मेलन उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

सेंट्रल पार्कची कामे गतीने पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांकडून शहरातील विकासकामांची पाहणी

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग बांधवानी पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन