vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास शासन सकारात्मक – शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास शासन सकारात्मक – शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

मुंबई, प्रतिनिधी : राज्यभरातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रश्नाबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी राज्यमंत्री डॉ भोयर बोलत होते. बैठकीस आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, उपसचिव आबासाहेब कवळे, संचालक (प्राथमिक) गोसावी, सहसंचालक श्रीराम पानझाडे यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री डॉ पंकज भोयर म्हणाले, गेल्या काही काळापासून तांत्रिक अडचणींमुळे अनेक शिक्षकांचे वेतन रखडले आहे. अशा सर्व शिक्षकांचे वेतन तातडीने अदा करण्याची कार्यवाही पूर्ण करावी. याशिवाय, आदिवासी दुर्गम भागामध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांना ‘एकस्तर वेतनश्रेणी’ लागू करण्याबाबत सविस्तर अहवाल शासनाला सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी शिक्षण आयुक्त कार्यालयाला दिल्या.

शिक्षकांच्या संच मान्यतेबाबत असलेल्या तक्रारी आणि प्रस्तावातील त्रुटी यांसारख्या समस्या सोडवण्यासाठी आता एकात्मिक उपाययोजना करावी. या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित केली जावीत. तसेच, संच मान्यतेशी संबंधित तक्रारी व अडचणींचे निवारण करण्यासाठी संचालक कार्यालयात एक स्वतंत्र आणि समर्पित कक्ष स्थापन करावा. अशाही सूचना राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी दिल्या.

कनिष्ठ महाविद्यालयांमधील सोयीसुविधा आणि उपलब्ध शिक्षक संख्या यांचा समतोल राखून, प्रात्यक्षिक वर्गाची क्षमता पूर्वीप्रमाणे ठेवण्याचे निर्देश देत राज्यमंत्री डॉ भोयर म्हणाले, शिक्षकांना सध्या जनगणनेची कामे आणि बीएलओ म्हणून निवडणूक विषयक कामे करावी लागत आहेत. या कामांचे समन्वय साधत पुढील शैक्षणिक वर्षाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी. तसेच, शिक्षकांना अशैक्षणिक आणि ऑनलाईन कामे कमी करण्यासाठी अभ्यासगटाच्या माध्यमातून आढावा घेण्यात यावा.

 

०००

संबंधित पोस्ट

शेतीला पूरक व्यवसायाची जोड देण्यासाठी एकात्मिक शेती पद्धत आवश्यक – केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान कृषी विज्ञान केंद्रात शेतकरी संवाद कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

विशेष सखोल पुनरीक्षण 2026′ (SIR) कार्यक्रम माहिती घेण्याकरिता येणाऱ्या मतदान केंद्राच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना मतदारांनी संपूर्ण सहकार्य करावे  –जिल्हाधिकारी किशन जावळे

सामनगाव–अंतरवाला व सामनगाव–काजळा रस्त्यांची दुरवस्था; तात्काळ दुरुस्तीची मागणी नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; अपघातांचा धोका वाढला, प्रशासनाने लवकर कारवाईचे आश्वासन

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा : सहपालकमंत्री ॲड आशिष जयस्वाल**विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा*रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर*

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रोजगार मेळावा रोजगार देणारे व्हा-कुलगुरु डॉ.फुलारी कौशल्य आत्मसात करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

राज्य लॉटरीच्या डिसेंबर महिन्यातील भव्यतम, मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर