vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

लंडनच्या लेडी मेयर डेम ससून लँगली यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट उत्पादन क्षेत्रासोबतच ‘एज्युसिटी’ आणि ‘मेडीसिटी’ सारख्या संकल्पनांमधील संधींवर विशेष भर देण्यात येणार; मुंबई–लंडन सहकार्याला चालना

लंडनच्या लेडी मेयर डेम ससून लँगली यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट-उत्पादन क्षेत्रासोबतच ‘एज्युसिटी’ आणि ‘मेडीसिटी’ सारख्या संकल्पनांमधील संधींवर विशेष भर देण्यात येणार; मुंबई–लंडन सहकार्याला चालना

मुंबई, प्रतिनिधी: सिटी ऑफ लंडनच्या लेडी मेयर डेम सूसन लँगली तसेच यूकेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची आज वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत मुंबई व महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.या बैठकीत महाराष्ट्र हे गुंतवणुकीसाठी अग्रगण्य केंद्र असल्याचे अधोरेखित करत उत्पादन क्षेत्रासोबतच ‘एज्युसिटी’ आणि ‘मेडीसिटी’ सारख्या नव्या संकल्पनांमधील संधींवर विशेष भर देण्यात आला.

लेडी मेयर डेम सुसन लँगली यांनी लंडन हे जागतिक भांडवल उभारणीसाठी महत्त्वाचे केंद्र असल्याचे सांगत महाराष्ट्रातील उद्योगांना आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तारासाठी लंडन एक विश्वासार्ह व्यासपीठ ठरू शकते, असे मत व्यक्त केले.यूकेचे प्रधानमंत्री केयर स्ट्रामेर यांच्या अलीकडील मुंबई भेटीदरम्यान उद्योग क्षेत्रातील दिग्गजांशी झालेल्या चर्चेचा सकारात्मक परिणाम आता गुंतवणूक प्रस्तावांमध्ये दिसून येत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

मुंबई’ आणि ‘लंडन’ या जागतिक शहरांमधील सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी संरचित संवाद यंत्रणा उभारण्याबाबतही चर्चा झाली. भारत–यूके मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर उद्योग, पायाभूत सुविधा व शाश्वत वित्तीय क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला.

या भेटीत भविष्यात अधिक व्यापक सहकार्याच्या संधी शोधण्याबाबत दोन्ही बाजूंनी सकारात्मक भूमिका व्यक्त करण्यात आली.

0000

संबंधित पोस्ट

राज्यातील १४ हजार ७४७ कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!दहा वर्षांहून अधिक सेवा देणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदांना शासनाची मान्यता..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या पुढाकारातून महत्त्वपूर्ण शासन निर्णय..

vishwatmaklokswamivarta

सशक्त समाजाच्या निर्मितीसाठी ‘ड्रग फ्री मुंबई’ अभियान महत्त्वपूर्ण – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींकडून ‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन

जुन्या बँक खात्यात विसरलेले, अडकलेले पैसे आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पुढाकाराने व्याजासह परत मिळण्याची सुवर्णसंधी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रोजगार मेळावा रोजगार देणारे व्हा-कुलगुरु डॉ.फुलारी कौशल्य आत्मसात करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

भाजपाचे हिमंता बिसवा सर्मा यांनी सलग दुसऱ्यांदा आसामचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. चार मंत्र्यांचाही शपथविधी. 

२५ वर्षांची प्रतीक्षा संपली हाजुरीतील १९ कुटुंबांना हक्काच्या घरांच्या चाव्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरित