vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

२५ वर्षांची प्रतीक्षा संपली हाजुरीतील १९ कुटुंबांना हक्काच्या घरांच्या चाव्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरित

२५ वर्षांची प्रतीक्षा संपली हाजुरीतील १९ कुटुंबांना हक्काच्या घरांच्या चाव्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरित

ठाणे – प्रतिनिधी हा

हाजुरी येथील सवेरा लॉज परिसरातील नागरिकांची घरे सन २००१ – ०२ मध्ये रस्ता रुंदीकरणासाठी संपादित करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल २५ वर्षे या नागरिकांचे पुनर्वसन प्रलंबित राहिले होते. मात्र, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक विकास कृष्णा रेपाळे व नगरसेविका नम्रता भोसले – जाधव यांनी केलेल्या सातत्यपूर्ण आणि प्रदीर्घ पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून १९ कुटुंबांची घराची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या एका अनौपचारिक कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १९ लाभार्थींना त्यांच्या नवीन घरांच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले.

यावेळी लाभार्थ्यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, ‘आम्ही हक्काचे घर मिळण्याची आशाच सोडून दिली होती. मात्र एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादामुळे आणि नगरसेवक विकास कृष्णा रेपाळे व नगरसेविका नम्रता भोसले – जाधव यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आज आम्हाला आमचे हक्काचे घर मिळाले.’

२५ वर्षांनंतर स्वतःच्या घराच्या चाव्या हातात घेताना अनेक नागरिकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तर चेहऱ्यावर समाधानाचे हास्य झळकत होते. हा क्षण उपस्थितांसाठी अत्यंत भावनिक आणि अविस्मरणीय ठरला.

या पुनर्वसनामुळे अनेक वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबांना दिलासा मिळाला असून, जनतेच्या प्रश्नांबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यास अशक्य वाटणारे प्रश्नही मार्गी लागू शकतात, याची पुन्हा एकदा प्रचिती आली.

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्ह्यात M-Sand धोरणाच्या अंमलबजावणी व प्रसिद्धीबाबतऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन

फुले दाप्त्यांना अपेक्षित मानवसेवा पैकी एक निराधार वृद्धांची सेवा होय-प्रताप भांबळे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त धान्य कोठी भेट…

श्री क्षेत्र जोतिबा मंदिर विकास आराखड्यासाठी 260 कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता…

जलयुक्त शिवार २.० आढावा बैठकजलसंधारणाची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा-जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

प्रशासन हे सुशासन करण्यात ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांचे मोलाचे योगदान – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

प्रत्येक मुलीने ‘एचपीव्ही’ लसीकरणाचा लाभ घ्यावा : पालकमंत्री जयकुमार रावल जागतिक महिला दिनानिमित्त दोंडाईचा येथे ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ