vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

राज्यातील किडनी विकारग्रस्त नागरिकांना मोफत डायलिसीस सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘महाडायलिसीस’ योजना

राज्यातील किडनी विकारग्रस्त नागरिकांना मोफत डायलिसीस सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘महाडायलिसीस’ योजना…

आरोग्य प्रतिनिधी-ग्रामीण भागातील किडनी विकारग्रस्त रुग्णांना शासकीय दवाखान्यात मोफत डायलिसीस सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या ‘महाडायलिसीस’ योजनेचा राज्यात महाराष्ट्र दिनी विस्तार करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते नवीन १२ डायलिसीस केंद्रांचे लोकार्पण आहे. त्यामुळे एकूण केंद्रांची संख्या १०४ वर पोहोचणार आहे. या नव्या केंद्रांमध्ये दुर्गम भागातील रुग्णालयांचाही समावेश करण्यात आला आहे.

राज्यातील किडनी विकारग्रस्त नागरिकांना मोफत डायलिसीस सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘महाडायलिसीस’ योजना सध्या विविध शासकीय रुग्णालयांत प्रभावीपणे राबवली जात आहे. ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा तसेच जिल्हा रुग्णालयांपर्यंत ही सेवा पोहोचवून ग्रामीण भागातील रुग्णांना घराजवळच निःशुल्क उपचार मिळावेत, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण रुग्णालयांत किमान ५ बेड्स, तर उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयांत ८ ते १० डायलिसीस बेड्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या राज्यात ९२ महाडायलिसीस केंद्रे कार्यरत असून त्यामध्ये ५५८ डायलिसिस बेड्स उपलब्ध आहेत.

लोकार्पण होणाऱ्या केंद्रांमध्ये मुरगुड (जि. कोल्हापूर), मूल (जि. चंद्रपूर), दारव्हा (जि. यवतमाळ), केज (जि. बीड), इगतपुरी (जि. नाशिक), रावेर (जि. जळगाव), मंगळवेढा (जि. सोलापूर), ढेबेवाडी (जि. सातारा), वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग), कुरखेडा (जि. गडचिरोली), दापोली (जि. रत्नागिरी) आणि बदलापूर (जि. ठाणे) येथील रुग्णालयांचा समावेश आहे.

‘महाडायलिसीस’ योजना एंड-टू-एंड डिजिटल प्लॅटफॉर्मवर आधारित असून, http://mahadialysis.in या संकेतस्थळावर तसेच मोबाइल अॅपद्वारे माहिती व सेवा उपलब्ध आहे. रुग्णांना ऑनलाईन स्लॉट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे उपचारासाठी प्रतीक्षा कालावधी कमी झाला आहे.

 

संबंधित पोस्ट

राज्यातील जनतेचे आरोग्य सदृढ राहावे आणि सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सुविधा विनासायास उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासन #सार्वजनिकआरोग्य क्षेत्रात अनेक उपक्रमसार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि #युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन..

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन   — जिल्हाधिकारी किशन जावळे क्षयरोग मुक्त 376 ग्रामपंचायतींचा सत्कार

सेंट जॉर्ज रुग्णालयातील ज्येष्ठ डॉक्टर प्राध्यापक प्रख्यात स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर राजेश्री दयानंद कटके यांना रविवारी यांना रविवारी ग्लोबल गायनिक अँड फर्टिलिटी 2025 हा पुरस्कार ने सन्मानित.

vishwatmaklokswamivarta

आला उन्हाळा – प्रकृती जपणुकीसाठी आरोग्य विषयक नियम पाळा’ : नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन

हज यात्रेकरुंचे लसीकरण व आरोग्य तपासणी

शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम लिनियरॲक्सलरेटर उपचार प्रणालीचे लोकार्पण