vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्यास्थानिक बातम्या

महालक्ष्मी सरस २०२६’ प्रदर्शनाचे बीकेसीत शनिवारी उद्घाटन

महालक्ष्मी सरस २०२६’ प्रदर्शनाचे बीकेसीत शनिवारी उद्घाटन

मुंबई, दि. प्रतिनिधी ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित ‘महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन 2026’ चा भव्य उद्घाटन सोहळा , शनिवार (2 मे) रोजी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीए मैदानावर पार पडणार आहेमहाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) (एमएसआरएलएम) यांच्या वतीने आयोजित या सोहळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे तसेच राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहांच्या (एसएचजी) उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबरोबरच महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे आणि ‘लोकल टू ग्लोबल’ या संकल्पनेला चालना देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे

‘महालक्ष्मी सरस 2026’ प्रदर्शन 2 ते 14 मे दरम्यान सर्वसामान्यांसाठी खुले राहणार असून, राज्यासह देशातील विविध भागांतील महिला उद्योजिकांची उत्पादने, खाद्यपदार्थ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा अनुभव नागरिकांना येथे घेता येणार आहेया प्रदर्शनात एकूण 500 स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील 230, इतर राज्यांतील 66, नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या महिला गटांचे 68 तसेच महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांचे 34 स्टॉल्स आहेत. याशिवाय नाबार्ड, माविम, खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई महानगरपालिका आणि इतर शासकीय विभागांचे 22 स्टॉल्स सहभागी झाले आहेत.

प्रदर्शनातील 80 स्टॉल्सचा वातानुकूलित फूड कोर्ट हे एक प्रमुख आकर्षण ठरणार असून, राज्यातील विविध भागांतील पारंपरिक खाद्यपदार्थ येथे उपलब्ध असतील. तसेच हातमाग वस्त्रे, वारली व बंजारा कला, लाकडी खेळणी, दागिने आणि इतर ग्रामीण उत्पादने खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी लॉकर्सची व्यवस्था, 25 किलोमीटर परिसरात मोफत होम डिलिव्हरी तसेच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि गर्भवती महिलांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येणार असून, उमेद परिवारातील सुमारे 65 लाख सदस्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहेयंदाच्या ‘महालक्ष्मी सरस’मध्ये एआर फोटोग्राफी, अ‍ॅनामॉर्फिक वॉल्स आणि इन्फोग्राफिक वॉल्ससारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ‘कंटेनर’ ही मध्यवर्ती संकल्पना असून, उद्योग, निर्यात आणि जागतिक संधींचे प्रतीक म्हणून ‘उद्योग किल्ला’ उभारण्यात आला आहे

००००

संबंधित पोस्ट

मुंबई महानगरपालिका निवडणूक- आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेची मोठी कारवाई

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ बंद होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जागतिक महिला दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शुभेच्छा

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापती पदासाठी  आरक्षण जाहीर

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखालील रमाई आवास योजना समितीची ५ हजार ७०० घरकुलांना मंजुरी

vishwatmaklokswamivarta

26 एप्रिलला नवी मुंबईत आंतराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा – ऑलिम्पिक पदक विजेत्या मेरी कोम यांची उपस्थिती*

जिल्हा वार्षिक योजना प्रारुप आराखडा बैठक-२०२५-२६जिल्हा विकासासाठी भरीव निधी देणार-उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta