vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न

        सांगली, प्रतिनिधी : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 अंतर्गत प्रकरणांवर केलेल्या कार्यवाहीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 अंतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या आढावा बैठकीस पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत, सांगली शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बिभीषण सारंगकर, नागरी हक्क संरक्षण पथकाच्या एस. व्ही. वागलगावे आदी उपस्थित होते.

      यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत दाखल प्रकरणे, पोलीस विभागाकडील व न्यायालयात प्रलंबित प्रकरणे व सद्यस्थिती, जातीच्या दाखल्याची प्रलंबित प्रकरणे, समाज कल्याण विभागाकडे प्राप्त प्रकरणे, तक्रारी, अत्याचार पीडितांना नुकसान भरपाई आदि प्रकरणांचा आढावा घेतला.     यावेळी बाळासाहेब कामत यांनी प्रलंबित प्रकरणे, मागील इतिवृत्त, पोलीस विभागाकडील प्रलंबित प्रकरणे आदिंबाबत सविस्तर आढावा समितीसमोर दिला.

बैठकीत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध सामाजिक पुरस्काराच्या अनुषंगाने प्राप्त असणाऱ्या प्रस्तावांना जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत पात्र, अपात्रबाबत मंजुरी देण्यात आली व पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

00000

संबंधित पोस्ट

शिंपोरा येथील पुलाची उभारणी तातडीने करावी सभापती प्रा.राम शिंदे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे निर्देशकामाबाबत तातडीने चौकशी करुन कारवाईचे निर्देश..

डिजिटल जनगणना 2027′ च्या तयारीला वेग; जिल्हास्तरीय क्षेत्रीय प्रशिक्षण संपन्न-जनगणनेचे कार्य अचूकपणे पूर्ण करा- डॉ. प्रवीणकुमार देवरे

पुण्यात खडकवासला धरण तुडुंब,धरणातून 2 हजार क्युसेक पाण्याचा प्रवाह सोडला जात आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

vishwatmaklokswamivarta

सह्याद्रीच्या कुशीत रंगलेला ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२६’

माजी सैनिकांच्या मुलांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात पुरेसा जलसाठा उपलब्ध; पाटबंधारे विभागाची माहितीअफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन