vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात’लेखापरीक्षक नेमणूकीसाठी निविदा सादर करण्‍याची मुदत 16 मे पर्यंत

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात’लेखापरीक्षक नेमणूकीसाठी निविदा सादर करण्‍याची मुदत 16 मे पर्यंत

        सांगली, प्रतिनिधी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली या कार्यालयाचे आर्थिक वर्षे १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ अखेरचे लेखापरीक्षण करण्याचे आहे. त्याकरीता सनदी लेखापरीक्षकांनी (Chartered Accountant) नियुक्ती करावयाची आहे. मान्यताप्राप्त सनदी लेखापरीक्षकांनी त्यांच्या निविदा अध्यक्ष/सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली यांच्या पत्यावर दिनांक 16 मे 2026 रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत सादर कराव्यात. या वेळेनंतर दाखल झालेल्या निविदेचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
इच्छुक लेखापरीक्षक यांनी लेखापरीक्षक संस्था/कंपनी/प्रो.प्रा.यांचे नांव, नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता, सनद नोंदणी क्रमांक व अनुभव, आर्थिक वर्षाकरीता लेखापरीक्षक फी (निविदेची रक्कम), सर्व करासहीत किती लेखापरीक्षक फी आकारणी केली जाईल याबाबत सविस्तर उल्लेख करून इच्छुक लेखा परीक्षकांनी त्यांच्या निविदा सिलबंद करून लिफाफ्यावर लेखा परीक्षक नेमणूकीबाबत असा स्पष्ट उल्लेख करून निविदा अध्यक्ष/सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली बी विंग बिल्डींग जिल्हा व सत्र न्यायालय आवार विजयनगर, सांगली या पत्त्यावर सादर कराव्यात. निविदा स्विकारण्याचा अगर नाकारण्याचा अधिकार राखून ठेवण्यात आलेला आहे.
    निविदा मंजूर झालेल्या लेखा परीक्षा संस्था/कंपनी / प्रो. प्रा. यांना सदरचे काम 1 महिन्याचे आत पूर्ण करावे लागेल. तसेच निविदा मंजूर झाल्यानंतर 1 महिन्याचे आत लेखापरिक्षण पूर्ण करत असलेबाबत बंधपत्र सादर करावे लागेल, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
00000

संबंधित पोस्ट

शेतकऱ्यांना पिक कर्ज मदतीसाठी ‘शेतकरी सहाय्यता केंद्र’;30 जूनपूर्वी पीक कर्ज नूतनीकरण करून घ्यावे-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

जगप्रसिद्ध उद्योजग इलॉन मस्क यांच्या टेस्ला कारचं देशातील पहिलं शोरुम मुंबई, ठळक अक्षरात ‘मराठी नामफलक’राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते  शोरुमचं उद्घाटन झाले

बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाकडून सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन 

शेतकऱ्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासोबतच कृषी क्षेत्राच्या बळकटीकरणाकरिता राज्य शासन कटिबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवार

वरसोली येथे पाठांतर स्पर्धा संपन्न

येत्या तीन महिन्यात प्राण्यांची गणना करणार-जिल्हाधिकारी आशिष येरेकर