vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

दहावीचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होणार

दहावीचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होणार

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल उद्या शुक्रवार दि. ८ मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी दिली आहे.

राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता १० वीच्या परीक्षेचा निकाल पुढील अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन जाहीर करण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळे

1) https://results.digilocker.gov.in

2) https://mahahsscboard.in

3) https://sscresult.mkcl.org

4) https://results.targetpublications.org

5) https://results.navneet.com

6) https://www.tv9marathi.com आणि7) https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc–10-results

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker App मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच https://mahahsscboard.in (in school login) या संकेतस्थळावर शाळांना त्यांच्या शाळांचा एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ https://mahahsscboard.in वरून स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या असल्याचे मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

दक्षता जनजागृती सप्ताहाला भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथेने सुरवात…

vishwatmaklokswamivarta

पोलीस दलाची कार्यक्षमता व बौद्धिक वाढीसाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरणार – केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद रॉय स्पर्धेत सर्वोच्च विजेता ठरला तेलंगणा संघ; अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यातील स्पर्धांची सांगता

वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ ४२६ शिक्षकांना मंजूर…

vishwatmaklokswamivarta

अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे ९४ कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समाजहितासाठी उद्योग क्षेत्राचे योगदान प्रेरणादायी

शिक्षक दिन कार्यक्रमात नवी मुंबई महापालिका शिक्षकांसह गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय ‘वीर गाथा 5.0’ मध्ये महाराष्ट्र अव्वल-देशातील सुपर 100 मध्ये सर्वाधिक 19 विजेते महाराष्ट्राचे

vishwatmaklokswamivarta