vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि आरोग्य समिती अध्यक्ष. हरीश भांदिर्गे यांनी केले सायन रुग्णालय येथे केले रक्तदान

मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि आरोग्य समिती अध्यक्ष. हरीश भांदिर्गे यांनी केले सायन रुग्णालय येथे केले रक्तदान

मुंबई प्रतिनिधी-दिवसभर कामकाजाची धावपळ केल्यानंतर रात्री शीव रुग्णालयात जावून महापौर श्रीमती रितू तावडे आणि सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष श्री. हरीश भांदिर्गे यांनी केले रक्तदानजागतिक थॅलेसेमिया दिनाचे औचित्य साधून, रक्त कमतरता (थॅलेसेमिया) ग्रस्त रुग्णांसाठी रक्तदानाबाबत जनजागृतीचा कृतिशील संदेश

🔷जागतिक थॅलेसेमिया दिनाचे औचित्य साधून, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे आणि सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष श्री. हरीश भांदिर्गे यांनी आज (दिनांक ८ मे २०२६) रात्री ८.३० वाजता शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात रक्तदान केले.

आज सकाळी धारावी आणि परळ मध्ये महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत विविध वैद्यकीय सेवा सुविधांचे लोकार्पण, त्यानंतर महानगरपालिका मुख्यालयात बैठका, दुपारी २.३० वाजेपासून सायंकाळपर्यंत महानगरपालिका सभागृह, त्यानंतर कार्यालयीन कामकाज असा दिवसभराचा अत्यंत व्यस्त क्रम आटोपला, त्यानंतर महापौरांनी सामाजिक बांधिलकीला प्राधान्य देत थेट शीव रुग्णालय गाठले. जागतिक थॅलेसेमिया दिनाचे औचित्य साधून महापौर श्रीमती रितू तावडे आणि सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष श्री. हरीश भांदिर्गे यांनीही रक्तदान करून सर्वांसमोर कृतिशील उदाहरण ठेवले. या दोन्ही लोकप्रतिनिधींनी या कृतीतून थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना आवश्यक रक्तपुरवठ्याबाबत जनजागृतीस चालना मिळाली आहे.

यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे, पॅथॉलॉजी विभाग प्रमुख श्रीमती अंजली अमरापूरकर तसेच संबंधित वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, रक्तपेढीचे कर्मचारी उपस्थित होते.महापौर श्रीमती रितू तावडे यांचे आवाहन

रक्तदान केल्यानंतर महापौर श्रीमती रितू तावडे म्हणाल्या की, “थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांसाठी मी दरवर्षी न चुकता रक्तदान करते. महापौर म्हणून कामकाजाची धावपळ वाढली आहे, राजकीय आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या आपल्या जागी नक्कीच आहेत. सर्वसामान्य नागरिकांना देखील विविध जबाबदाऱ्या असतातच. तरीही माणुसकीचे नाते जपण्यासाठी आपण सर्वांनी व्यस्त जीवनातून थोडा वेळ काढणे गरजेचे आहे. थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना रक्ताची नितांत आणि नियमित गरज असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने वर्षातून किमान एकदा तरी रक्तदान करून या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे. मुंबईकरांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे मी या निमित्ताने विनम्र आवाहन करते

संबंधित पोस्ट

उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते सेवानिवृत्त १३ कर्मचाऱ्यांचा सन्मान

जरंडेश्वर उपकेंद्रातून 33 केव्ही नेर उपसा सिंचन योजनेवरील वाहिनी आज होणार कार्यान्वित नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे महावितरणचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत उन्हाळी हंगाम 2024-25 अंतर्गत महाडीबीटी पोर्टल वर अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

डॉ.कराड यांनी घेतला औट्रम घाट भुयारी मार्ग,गॅस पाईपलाईनसह विविध विषयांचा आढावा

एकल महिलांच्या उन्नतीसाठी जिल्हा परिषद कटीबद्ध- जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे

कोल्हापूर मिलेट व फळ महोत्सव हा पणन मंडळाचा स्तुत्य उपक्रम- चित्रपट अभिनेते राहूल सोलापूरकर