vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजनखाजगी नौकरी इच्छुकांसाठी सुवर्णसंधी; १२ मे रोजी बुलढाण्यात रोजगार मेळावा

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजनखाजगी नौकरी इच्छुकांसाठी सुवर्णसंधी; १२ मे रोजी बुलढाण्यात रोजगार मेळावा

बुलढाणा, प्रतिनिधी : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती तसेच STEP अंतर्गत अल्प मुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, बुलढाणा आणि श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.हा रोजगार मेळावा दि. १२ मे २०२६ रोजी, मंगळवारी सकाळी ९.३० वाजता श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी, पाळणा घर, बुलढाणा येथे आयोजित करण्यात आला आहे.

सदर मेळाव्यात वैभव एंटरप्रायजेस अंतर्गत अंकित पल्प मानसार, विशल्य प्रिं्टमन नागपूर, संविजय इन्फ्रास्टक्चर बुटीबोरी, अपेक्स क्नीव्स नागपूर, असरोफॅब मशिनरीज नागपूर तसेच विराज प्रोफाइल मुंबई आदी नामांकित उद्योग समूह सहभागी होणार असून त्यांनी विविध रिक्त पदांची अधिसूचना दिली आहे.या रोजगार मेळाव्यात नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेणार असून प्राथमिक निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तसेच काही उमेदवारांना प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षणाची संधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.१० वी, १२ वी, आयटीआय, पदवीधर तसेच STEP अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेले पुरुष व महिला उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार एकापेक्षा अधिक पदांसाठी मुलाखत देण्याची संधी उपलब्ध राहणार आहे.रोजगार इच्छुकांनी स्वखर्चाने उपस्थित राहून नाव नोंदणी करून कंपन्यांच्या प्रतिनिधींशी मुलाखत द्यावी व या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. ग. प्र. बिटोडे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा कार्यालयाशी दूरध्वनी क्रमांक (०७२६२) २४२३४२ वर संपर्क साधावा.

00000

संबंधित पोस्ट

जगजीवन राम झोपडपट्टी सारखी दुर्घटना पुन्हा होऊ नये याची दक्षता घ्यावी – पालकमंत्री जयकुमार गोरे पालकमंत्री गोरे यांच्याकडून जगजीवन राम झोपडपट्टीची पाहणी व मृत शालेय विद्यार्थ्यांनीच्या कुटुंबीयांचे सांत्वन

मच्छीमारांनो सावधान..!1 जूनपासून समुद्रात मासेमारीला बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कडक कारवाई

नवरात्रीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात महिला सक्षमीकरण उत्सव…

vishwatmaklokswamivarta

बालकांच्या आधारवरील बायोमेट्रीक अद्यावतीकरणासाठी मोहीम

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे आठ दिवसात पंचनामे करा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- अतिवृष्टीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत दिले निर्देश – महसूल, ग्रामविकास, कृषि विभागाने बांधावर जावून संयुक्त पंचनामे करावेत- नुकसानभरपाई दिवाळीपूर्वी जमा होण्यासाठी कार्यवाही करावी- गृहोपयोगी साहित्यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मदत करणार

राज्य युवा पुरस्कार सन 2023-24 साठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta