vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कोकणचा विकास हा महाराष्ट्राच्या विकासाचा कणा — उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार रोहा येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

कोकणचा विकास हा महाराष्ट्राच्या विकासाचा कणा — उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार रोहा येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी: रोहा शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते आज संपन्न झाले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

डॉ. सी. डी. देशमुख सभागृह, रोहा येथे आयोजित कार्यक्रमास खासदार सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री कु. अदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, रोहा-अष्टमी नगर परिषद नगराध्यक्षा कु. वनश्री शेडगे, उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, सभापती विजया पाशिलकर, उपसभापती संजय मांडलुस्कर, मुरुड नगराध्यक्षा दांडेकर, मुख्याधिकारी अजयकुमार एडके आदी मान्यवर उपस्थित होते

यावेळी मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार म्हणाल्या की, विकास म्हणजे केवळ सिमेंटच्या इमारती अथवा रस्ते नव्हेत, तर सामान्य नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणणे होय. श्रद्धा, संस्कृती, पर्यावरण, पर्यटन आणि रोजगार यांचा समतोल राखून विकास साधण्यास शासन प्राधान्य देत आहे. कोकणातील नागरिक मेहनती, प्रामाणिक व कष्टाळू असून कोकणाचा विकास हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा भक्कम पाया असल्याचे त्यांनी सांगितले.

रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची पावन भूमी असून सामाजिक समतेचा इतिहास घडविणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महाड चवदार तळे सत्याग्रहाचीही ही भूमी आहे. कोकण हा निसर्गसंपन्न, सांस्कृतिक वैभव लाभलेला प्रदेश असून येथील विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

रोहा-अष्टमी नगर परिषद हद्दीतील कुंडलिका नदीकाठावर विविध ठिकाणी पुरसंरक्षक भिंती बांधणे, कुंडलिका नदी संवर्धन गार्डन येथे खाऊ गल्ली विकसित करणे, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स यांनी तयार केलेले शिवसृष्टी शिल्प उभारणे, धावीर महाराज मंदिर येथे भक्तनिवास नूतनीकरण करणे तसेच स्वर्गीय दत्ताजीराव ग. तटकरे ब्लड बँक विकसित करणे आदी विविध विकासकामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले.

महिला व बालविकास मंत्री कु. अदिती तटकरे यांनी आपल्या मनोगतात स्वर्गीय अजितदादा यांच्या कार्याचा उल्लेख करताना, दर्जेदार विकासकामे करण्यावर त्यांचा नेहमी भर होता, असे सांगितले. कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्पाच्या पुढील टप्प्यातील सुमारे 12.30 कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन आज होत असल्याचे त्यांनी नमूद केले. रायगड व कोकणाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

खासदार सुनील तटकरे यांनी स्वर्गीय अजितदादा यांच्या विकासदृष्टीचा उल्लेख करताना, राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून विकासाला गती देण्याचे कार्य सुरू असल्याचे सांगितले.

कार्यक्रमास नागरिक, लोकप्रतिनिधी तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

बोगस शिक्षक भरती व शालार्थ आयडी घोटाळ्याची राज्यस्तरीय एसआयटी करणार चौकशी आमदार सुधाकर अडबाले यांचा प्रश्न : शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती

महाराष्ट्राला २०४७ पर्यंत जागतिक दर्जाचे कौशल्य केंद्र बनवणार- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा’विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाची कार्यशाळाकार्यशाळेत ६० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा सहभाग…

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त ‘रेड रन’ स्पर्धा

जागतिक युवा कौशल्य विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

विभागीय महसुल क्रिडा स्पर्धांचे उत्साहात उद्घाटन· महसुल राज्य मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते महसुल क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धांचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

ऑपरेशन सिंदूरचा समग्र राजकीय-लष्करी उद्देश पाकिस्तानला छुपे युद्ध लढल्याबद्दल शिक्षा करणे हा होता; पाक-पुरस्कृत दहशतवाद ही एक सुनियोजित रणनीती आहे : लोकसभेत संरक्षण मंत्र्यांचे प्रतिपादन