vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा परिषदेच्या १०० शाळांमध्ये वॉटर फिल्टर बसविणार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती

जिल्हा परिषदेच्या १०० शाळांमध्ये वॉटर फिल्टर बसविणार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती

नाशिक, प्रतिनिधी : जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या बैठकीत उच्च प्राथम्य बाबींमधील १३८ कामांना मान्यता देण्यात आली आहे. त्यात जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १०० शाळांमध्ये वॉटर फिल्टर बसविण्याच्या कामांस जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठान निधीतून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी चार कोटी ५० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

वॉटर फिल्टर बसविण्यात येणाऱ्या तालुकानिहाय शाळांची नावे अशी : चांदवड : मंगरुळ, कानमंडाळे, कुंडलगाव, भोयेगाव, पिंपळद. देवळा : वरवंडी, रामनगर, महात्मा फुलेनगर, महालपाटणे. दिंडोरी : वाघाड, भनवड, पुणेगाव, हनुमंतपाडा, कोचरगाव, चिंचखेड, जऊळके दिंडोरी, अहिवंतवाडी. कळवण : भेंडी, दळवट, नवी बेज, देवळीवणी, गणेोरे, पिंपळ खुर्द, कळवणे मुले.

पेठ : कोहोर, हातरुंडी, दोनवाडी, नाचलोंढी, हरणगाव, केजीबीव्ही पेठ. सुरगाणा : करवंदे, सराड, ठाणगाव, सूर्यगड, पळसण, मनखेड, उंबरठाण, अंबाठा, केजीबीव्ही अलंगुण. नाशिक : लाडची, सामनगाव, मातोरी, जाखोरी, विल्होळी. नांदगाव : चांदोरा, टाकळी बु., नांदूर, जातेगाव, साकोरा, नागापूर. सिन्नर : गोंदे, पांगरी बुद्रूक, मुसळगाव, शिवडे, माळेगाव, वडांगळी. निफाड : सारोळे थडी, पालखेड, खडक माळेगाव, देवीचा माथा, कोठुरे, शिरवाडे वणी. इगतपुरी : चिंचलखैर, भावली खुर्द, भरवीर खुर्द, कांचनगाव, मुंडेगाव, मोंडाळे, केजीबीव्ही घोटी. येवला : राजापूर, उंदीरवाडी, मुखेड, अंगुलगाव, अंदरसूल, देवठाण. त्र्यंबकेश्वर : ब्राह्मणवाडे, अंबोली, चिंचवड, वेळूंज, ठाणापाडा, वाघेरा, हरसूल, केजीबीव्ही त्र्यंबकेश्वर. बागलाण : श्रीपुरवडे, जायखेडा मुली, वायगाव, अ. सौंदाणे, अंतापूर, अंबासन, कोटबेल. मालेगाव : अजंग, करंजगव्हाण, अस्ताणे, डोंगराळे, दाभाडी मुली, जळगव गा., चंदनपुरी मुली, पाटणे, सांजवहाळ. या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुला- मुलींना शुद्ध पाणी मिळणार आहे.

०००००

संबंधित पोस्ट

अचलपूर आणि परिसरातील १०५ गावांसाठीवाढीव पाणीपुरवठा योजनेस गती देण्यात येणार- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

राज्यातील अनधिकृत कत्तलखान्यांवर कारवाईचे आदेश- मंत्री उदय सामंत

संविधानाने दिलेले समान हक्क तृतीयपंथीयांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध -जिल्हाधिकारी संतोष पाटील* 

दि.11 जानेवारी रोजी किल्ले रायगड येथे गडरोहण स्पर्धेचे आयोजन,इच्छुकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे

vishwatmaklokswamivarta

मौजे कोलशेत येथील जमीन प्रकरणी अहवाल सादर करावा-विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

vishwatmaklokswamivarta

माझं लातूर, हरित लातूर’ अभियानांतर्गत यंदा सलग दुसऱ्या वर्षी लातूर शहरातील गंजगोलाई येथे आयोजित ‘लातूर हरितोत्सव’चे उद्घाटन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते संपन्न