vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये आणखी13 रूग्णालयांच्या समावेशासाठी शासनास प्रस्ताव- जिल्हा संनियंत्रण समितीच्या बैठकीत निर्णय

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये आणखी13 रूग्णालयांच्या समावेशासाठी शासनास प्रस्ताव- जिल्हा संनियंत्रण समितीच्या बैठकीत निर्णय

        सांगली, प्रतिनिधी : महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये सांगली जिल्ह्यातील आणखी तेरा रुग्णालयांच्या समावेशाबाबतचा प्रस्ताव शासनाला मंजुरीसाठी पाठवण्याचा निर्णय जिल्हा संनियंत्रण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे समन्वयक सुभाष नांगरे, समितीचे सदस्य रंगनाथ शिंपुगडे यांच्यासह रूग्णालयांचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यामध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सध्या 184 रुग्णालये कार्यरत आहेत. यामध्ये 16 शासकीय, 87 खाजगी, 70 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 11 शहरी आरोग्य केंद्रे, 121 उपकेंद्रे यांचा समावेश आहे. शासनास पाठवलेला प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर यामध्ये आणखी 13 खाजगी रूग्णालयांचा समावेश होणार आहे.

या बैठकीत महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये जिल्ह्यातील आणखी 13 रूग्णालयांच्या समावेशाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. रूग्णालयात उपलब्ध असणारे डॉक्टर्स, सोयीसुविधा , बेडची संख्या याचा आढावा घेण्यात आला. यामध्ये गाडवे हॉस्पिटल, तासगाव, मिरजकर आय हॉस्पिटल, आष्टा, यादव ऑर्थोपेडिक हॉस्पिटल, शिराळा, सूर्या हॉस्पिटल, भिवघाट, स्वस्तिक हॉस्पिटल, मिरज, बेबी हॉस्पिटल, मिरज, अंकुर हॉस्पिटल, ईश्वरपूर, डॉ. घट्टे युरॉलॉजी हॉस्पिटल, मिरज, दाते हॉस्पिटल, कोयना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ईश्वरपूर, वसंतदादा पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड इन्स्टिट्यूट ऑफ योगा, सांगली आणि अपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ईश्वरपूर या रूग्णालयांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये अंगिकृत करण्याबाबत माहिती देण्यात आली.

00000

संबंधित पोस्ट

जालना महसूल योजना महात्म्य छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आज रोजी सांगता झाली असून शिबिर संपन्न यावेळी दीप प्रज्वलन करताना खासदार कल्याण काळे आमदार अर्जुनराव खोतकर महापौरवंदनामध्ये उपमहापौर राजेश राऊत भास्कर आबा दानवे जिल्हाधिकारी अशीवामित्त रामदास दौंड जालन्यात महसूल योजनांचा महाकुंभ; ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आज रोजी सांगता झाली असून शिबिर संपन्न

शासकीय मुलामुलींचे वसतिगृह येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी रेणुका राठोड यांनी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानअंतर्गत जवळ जवळ 150 मूल व मुली यांना वाहन चालवण्याचा परवाना,

vishwatmaklokswamivarta

मुंबई क्रिकेट असोसिएशनवर कारवाई! अन्न परवाने निलंबित, अनेक नियमांचं सर्रास उल्लंघन

मुंबईत ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन-१४ ऑक्टोबर रोजी रवींद्र नाट्य मंदिरात विशेष सांस्कृतिक सादरीकरण; रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातून अंमली पदार्थाचे सन २०२९ पर्यंत समूळ उच्चाटन नशामुक्त भारत अभियानात पुढचे पाऊल, सर्वसमावेशक धोरण.. आणि मंत्रिमंडळ निर्णय

vishwatmaklokswamivarta

नाशिक येथील गृहनिर्माण कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta