vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

कवठेमहांकाळ तालुक्यात 69 लाखांचा विनापरवाना ‘इंपोर्टेड’ बेदाणा जप्त-अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

कवठेमहांकाळ तालुक्यात 69 लाखांचा विनापरवाना ‘इंपोर्टेड’ बेदाणा जप्त-अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

       सांगली, प्रतिनिधी: अन्न व औषध प्रशासन, सांगली कार्यालयाने बेकायदेशीर अन्नपदार्थांच्या साठवणुकीविरुद्ध केलेल्या कारवाईत कवठेमहांकाळ तालुक्यातील चोरोची येथे सुमारे 69 लाख 17 हजार 596 रुपये किंमतीचा 26 हजार 6 किलो आयात केलेला बेदाणा जप्त केला आहे. जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली असल्याचे सहायक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे

प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, दि. 12 मे 2026 रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मे. अजितकुमार पाटील बेदाणा प्रोसेसिंग सेंटर, गट नं. 767, जांभूळवाडी फाटा, मु. पो. चोरोची, ता. कवठेमहांकाळ या पेढीची तपासणी केली. यावेळी सदर आस्थापनेत पत्र्याच्या शेडमध्ये मशिनरीच्या सहाय्याने बेदाण्याचे निटिंग, ग्रेडिंग / सॉर्टिंग आणि पॅकिंग सुरू असल्याचे निदर्शनास आले. तसेच शेतकऱ्यांकडून आलेल्या द्राक्षांपासून प्रक्रिया करून बेदाणा तयार करण्याची प्रक्रियाही तेथे सुरू होती.

        तपासणी दरम्यान पथकाला अफगाणिस्तानमधून आयात केलेल्या बेदाण्याचे 10 किलोचे पांढरे बॉक्स आढळून आले. याबाबत सखोल चौकशी केली असता, हा आयात केलेला माल दिल्ली येथील ‘देव इम्पेक्स’, 46/11, नया कटरा ईश्वर भवन, खरी बावली, दिल्ली या पेढीने आयात केल्याचे व तो न्हावा शेवा पोर्ट, रायगड वरुण देव इम्पेक्स, पहिला मजला, रूम नं. ०१, लक्ष्मी अॅग्रो कोल्ड स्टोरेज, मालगाव-तानंग रोड, मालगाव ता. मिरज, जि. सांगली या नावाने केलेला होता. मात्र, हा माल प्रक्रिया करण्यासाठी चोरोची येथील विनापरवाना पेढीकडे का पाठवला? याबाबत संबंधित मालकाकडे कोणतीही माहिती व कागदपत्रे आढळून आली नाहीत. तसेच सदर आयात केलेल्या बेदाण्याच्या गुणवत्तेबाबत कुठल्याही प्रकारचे विश्लेषण केलेले नसल्याचे आढळून आले.

  त्यामुळे मे. अजितकुमार पाटील बेदाणा प्रोसेसिंग सेंटर या विनापरवाना पेढीच्या ठिकाणी पुरवठ्याचा कागदोपत्री पुरावा नसणे, तसेच सदर आयात बेदाण्याचा विश्लेषण अहवाल नसल्यामुळे व तसेच सदर पेढीकडे अन्न सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत नोंदणी/ परवाना नसणे, सदर इंपोर्टेड बेदाणा कायद्यातील मानकानुसार नसल्याच्या संशयामुळे इंपोर्टेड बेदाण्याचा 69 लाख 17 हजार 596 रुपये किंमतीचा 26 हजार 6 किलो इतका साठा जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने जप्त करण्यात आला आहे. सदर अन्नपदार्थांचे नमुने घेवून विश्लेषणाकरिता अन्न चाचणी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. सदर विश्लेषण अहवाल प्राप्त होताच त्याअनुषंगे पुढील कार्यवाही घेण्यात येईल. याबाबतचा पुढील तपास अन्न सुरक्षा अधिकारी प्र. ने. जिनगर हे करीत आहेत. ही कारवाई सहायक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे यांचा मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी सर्वश्री प्र. ने. जिनगर, अ. अ. पवार व सु. स. खांडेकर यांनी केली असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

बाल कामगार प्रथा विरोधी जनजागृती अभियान; विविध कार्यक्रमाचे आयोजन

जिल्हा गंथोत्सवाचे थाटात उद्घाटन;सुजाण समाज घडविण्यासाठी ग्रंथ वाचनाची चळवळ व्हावी- पुरुषोत्तम भापकर

vishwatmaklokswamivarta

रोहा येथे पंडित दीन दयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

जालना शहरातील मस्तगड परिसरातील युवकांचाभाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

आज महाराष्ट्र सरकारचा स्टारलिंकसोबत करार

vishwatmaklokswamivarta

मुंबई व छत्रपती संभाजीनगरमधील शैक्षणिक संस्था, वसतिगृहांचे अद्ययावतीकरण करण्यात येणार – सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकास योजनासाठी ५०० कोटीची तरतूद

vishwatmaklokswamivarta