vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

युवकांसाठी ‘अमृत चे’ ड्रोन प्रशिक्षण; परवानाही मिळणार खुल्या प्रवर्गाच्या आर्थिक दुर्बल घटकातील युवकांनी अर्ज करावेत

युवकांसाठी ‘अमृत चे’ ड्रोन प्रशिक्षण; परवानाही मिळणार खुल्या प्रवर्गाच्या आर्थिक दुर्बल घटकातील युवकांनी अर्ज करावेत

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी आजच्या आधुनिक काळात शेती, फोटोग्राफी, सर्वेक्षण, सुरक्षा तसेच अनेक तांत्रिक क्षेत्रांमध्ये ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. भविष्यातील गरज ओळखून महाराष्ट्र शासनाच्या ‘अमृत’ संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी पूर्णपणे मोफत ड्रोन ऑपरेटर (पायलट) प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण यशस्वीरी्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना अधिकृत ड्रोन पायलट परवाना (License) दिला जाणार आहे.

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या स्वायत्त संस्थेच्या “अमृत ड्रोन मिशन” अंतर्गत हा उपक्रम राबवला जात आहे. ग्रामीण भागातील युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध करून देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. प्रशिक्षण कालावधी १० दिवस.असून प्रशिक्षण पूर्णपणे मोफत आहे.प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांची राहण्याची व जेवणाची मोफत व्यवस्था संस्थेमार्फत केली जाईल.प्रशिक्षणानंतर अधिकृत ड्रोन पायलट परवाना मिळणार, ज्यामुळे करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहे.इतर कोणत्याही शासकीय संस्था किंवा महामंडळांचा लाभ न मिळणाऱ्या खुल्या प्रवर्गातील २५ जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या योजनेसाठी पात्र आहेत. यामध्ये प्रामुख्यान ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार या जातींचा समावेश आहे.

 कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी असावे. वय१८ ते ५५ वर्षांदरम्यान. असावे किमान १२ वी उत्तीर्ण. असावा.अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य. आहे  शेतकरी कुटुंबातील उमेदवारांना विशेष प्राधान्य दिले जाईल.अर्जासोबत वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अधिक माहितीसाठीअमृत जिल्हा कार्यालय, पुंडलिक नगर रोड, सेक्टर ४,(सिडको), हनुमाननगर, पाण्याच्या टाकीजवळ, छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क करावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे आणि उपव्यवस्थापक योगेश रोडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.युवकांसाठी ‘अमृत चे’ ड्रोन प्रशिक्षण; परवानाही मिळणार

00000

संबंधित पोस्ट

मिरज, वाळवा, शिराळा, पलूस तालुका, मनपा क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय शाळांना 20 व 21 ऑगस्ट रोजी सुट्टी

संतपीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी भागवत धर्म जगभरात पोहोचवतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संत तुकाराम महाराज संतपीठ येथे कलादालन व सभागृहाचे लोकार्पण

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून आयोजितप्रशासन चषक क्रिकेट स्पर्धेत पोलीस विभाग विजेता

vishwatmaklokswamivarta

वारणा धरणग्रस्तांना शेतीयोग्य जमिनींचे वाटप करण्यासंदर्भातील कार्यवाही करावी – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील

विशेष लेख -महाराष्ट्रात जालना जिल्ह्याची  रेशीम निर्मितीकडे वाटचाल…

सामान्य नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी प्रयत्नरत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील   – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे आरोग्य सेवांचे लोकार्पण- जिल्हा वार्षिक योजनेतून बर्न आयसीयु, सोनोग्राफी मशीन