vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

⚖️🚨 *परवान्याचा गैरवापर; जनबंधू स्केल सर्व्हिसेसचा विक्री परवाना निलंबित* 🚨⚖️📍 *वैध मापन शास्त्र विभागाची कारवाई*.

⚖️🚨 *परवान्याचा गैरवापर; जनबंधू स्केल सर्व्हिसेसचा विक्री परवाना निलंबित* 🚨⚖️📍 *वैध मापन शास्त्र विभागाची कारवाई*

📰 *गडचिरोली, प्रतिनिधी :* इलेक्ट्रॉनिक वजन काटे विक्री व सेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या *जनबंधू स्केल सर्व्हिसेस, चामोर्शी* या संस्थेवर वैध मापन शास्त्र विभागाने कठोर कारवाई करत त्यांचा विक्री परवाना निलंबित केला आहे. ❌⚖️👉 संबंधित संस्थेकडून अधिकार नसताना लहान दुकानदारांकडे जाऊन वजन काट्यांची पडताळणी व मुद्रांकन करून देण्याच्या नावाखाली रक्कम घेतल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

📋 वैध मापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक *जितेंद्र मोरे* यांच्या आदेशानुसार *जनबंधू स्केल सर्व्हिसेस, चामोर्शी* प्रोप्रायटर *अमोल नोमेश्वर जनबंधू* यांचा विक्री परवाना क्रमांक *LM/GDL/LD/018* दिनांक *२९ एप्रिल २०२६* पासून निलंबित करण्यात आला आहे.

🔍 तपासादरम्यान संबंधित परवानाधारकाने वैध मापन शास्त्र अधिनियम व परवान्याच्या अटींचा भंग केल्याचे आढळून आले.

⚠️ वैध मापन शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, संबंधित संस्थेला केवळ इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांच्या विक्रीचा परवाना देण्यात आला होता. मात्र, त्यांनी अधिकृत अधिकार नसताना विविध किरकोळ दुकानदारांकडे जाऊन वजन काट्यांची पडताळणी, मुद्रांकन व प्रमाणिकरण करून देण्याचे सांगत त्याबदल्यात रक्कम स्वीकारल्याचे समोर आले.

🏪⚖️ वजन काट्यांचे अधिकृत पडताळणी व मुद्रांकन करण्याचा अधिकार केवळ वैध मापन शास्त्र विभागाकडे असताना अशा प्रकारे नागरिकांची व व्यापाऱ्यांची दिशाभूल करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

📢 या पार्श्वभूमीवर वैध मापन शास्त्र विभागाचे निरीक्षक *आर.एन. फुलझेले* यांनी नागरिक, व्यापारी व ग्राहकांनी वजन माप पडताळणी अथवा मुद्रांकन प्रक्रिया अधिकृत शासकीय यंत्रणेमार्फतच करून घ्यावी, असे आवाहन केले आहे. ✅

संबंधित पोस्ट

रासायनिक गुलालांची विक्री, साठवणुक व वापरण्यास बंदी; जिल्हाधिकारी यांचे आदेश

राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत एक दिवस गावकऱ्यासोबत उपक्रमाचा शुभारंभ विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी साधला ग्रामस्थांशी संवाद

महाराष्ट्रात मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहिम; ९.८६ कोटी मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा

महापर्यटन उत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद*

केंद्रीय अर्थसंकल्पात ‘कृषी एआय’ला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्यावर भर – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे शेती व संलग्न क्षेत्रांसाठी भरीव तरतुदी; शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला चालना

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक २०२६ : बुलढाण्यात २६ एप्रिल रोजी मतदान