vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

घनकचरा व्यवस्थापन नियमाचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक-फौजदारी कारवाई कारवाईचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना  …

घनकचरा व्यवस्थापन नियमाचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक-फौजदारी कारवाई कारवाईचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना  …

नांदेड द प्रतिनिधी- जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी BWG Entity यांनी घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ व मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करून आपला परिसर स्वच्छ ठेवावा. या नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक किंवा फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला आहे.

भारत सरकार पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयामार्फत घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 निश्चित करून दिले असून, त्याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2026 पासून सुरु झाली आहे. तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 मे 2026 रोजीच्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्यात 14 मे 2026 रोजी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे.घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 नुसार प्रत्येक नागरिकांनी त्यांच्या घरातील घनकचरा हा ओला कचरा, सुका कचरा, सॅनिटरी कचरा व विशेष देखभाल/घरगुती घातक कचरा या 4 पद्धतीने वर्गीकृत करून घंटागाडीत देणे बंधनकारक आहे. नागरिकांनी उघड्यावरील कचरा जाळू नये. सार्वजनिक ठिकाणी, नालीमध्ये कचरा फेकू नये, सॅनिटरी पॅड, डायपर व्यवस्थितपणे गुंडाळून घंटागाडी स्वच्छता कर्मचाऱ्यास देणे, कोणत्याही परिस्थितीत वैद्यकीय, घातक कचरा घरगुती कचऱ्यात मिसळू नये. रस्त्यावरील विक्रेत्यांनी, व्यापाऱ्यांनी त्यांचेकडील शिल्लक, उष्टे अन्न, डिस्पोजेबल प्लेट, ग्लास, कप, कॅन, नारळाचे कवच, पॅकेजिंग, पाउच इत्यादी कचरा थेट रस्त्यावर न फेकता वर्गीकरणानुसार साठविण्यासाठी वेगवेगळे डब्बे, कंटेनर ठेवावीत.

घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 मधील नियम 6 अन्वये Bulk Waste Generator म्हणजे रहिवासी सोसायटी, अपार्टमेंट, गृहनिर्माण संस्था, सरकारी कार्यालय, विभाग, शैक्षणिक संस्था, रेल्वे-बस स्टेशन, मॉल्स, हॉटेल, हॉस्पीटल, मार्केट, मंगल कार्यालये, स्टेडियम ई. ज्यांचे क्षेत्र 20 हजार स्क्वेअर मीटर आहे, जे दररोज 40 हजार लिटर पाणी वापरतात, जे दररोज 100 किलो किंवा त्यापेक्षा जास्त कचरा निर्माण करतात अशा सर्व BWG यांनी कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला कचऱ्यावर जागेवर प्रक्रिया करावी व सॅनिटरी, सुका कचरा नगरपरिषद, मनपा किंवा अधिकृत एजन्सीकडे सुपूर्द करावा. जे BWG संस्था निर्देशांचे पालन किंवा नियमाकडे दुर्लक्ष करतील त्यांचे पाणी, वीज पुरवठा थांबविण्यासंबंधी जिल्हाधिकारी यांना अधिकार आहेत. याबाबतची नोंद सर्व संबंधितांनी घ्यावी, असेही कळविले आहे.

ओला कचरा : यात खाद्य पदार्थांचे अवशेष (भाताचे पाणी, तेल, मसाले), भाजीपाला, फूलांचे पंखुरी आणि माळा, गवत, बागेचा कचरा (झाडांची कतरणी), कागदाचे अवशेष, दूध आणि दही पात्रे, पशु खाद्य अवशेष इ. समावेश आहे.

सुका कचरा :  प्लास्टिक (बॉटल, पाउच, बॅग), कागद (वर्तमानपत्र, पत्रिका, पुस्तके), धातू (अॅल्युमिनियम, स्टील, तांबे), काच (बॉटल, पात्रे, खिडकी), लाकडी वस्तू, (फर्निचर, बक्से), रबर (टायर, जूते), जुने कपडे, (जुनी साडी, कमीज) इ.

सॅनिटरी कचरा :सॅनिटरी पॅड, डायपर, फेस मास्क, वाईप्स, हँडग्लोज, सॅनिटरी औषधे (बॉटल, ट्यूब, पाउच), संक्रामक पदार्थ, औषधांचे अवशेष इ. विशेष देखभाल-घरगुती घातक कचरा : बॅटरी (सेल, रिचार्जेबल), ट्यूब लाइट, बल्ब (पारायुक्त), कीटनाशक, खाद अवशेष, ई-कचरा, (जुने फोन, कंप्यूटर पार्टस, ई.), रासायनिक पदार्थ (पेंट, विषारी द्रव) या वस्तुंचा यात समावेश आहे.

00000

संबंधित पोस्ट

मुंबई काँग्रेसचे महासचिव श्री तुषार एकनाथराव गायकवाड यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन

शिवराज्याभिषेक सोहळ्याचे काटेकोरपणे नियोजन करा — रोहयो मंत्री भरत गोगावले #शिवराज्याभिषेक रायगड जिमाका दि. १६– रायगड किल्ला येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे तिथी व तारखेनुसार अनुक्रमे ६ व ९ जून रोजी आयोजन करण्यात आले आहॆ. या कार्यक्रमाच्या नियोजनाची रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षते खाली सर्व प्रमुख विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी या कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन करण्याच्या सुचना त्यांनी सर्व यंत्रणेला दिल्या. महाड शासकीय विश्रामगृहात आयोजित या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अप्पर पोलीस अधिक्षक अभिजित शिवथरे, उपजिल्हाधिकारी डॉ रविंद्र शेळके यांसह विविध विभागाचे अधिकारी व कोकणकडा मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले की ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा आपल्या अस्मितेचा विषय आहॆ. गेली ३५ वर्ष हा उत्सव सुरु आहॆ. या कार्यक्रमाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहॆ. त्यामुळे हा कार्यक्रम सुनियोजित व सुव्यवस्थितपणे पार पडण्याची जबाबदारी सर्वांवरच आहे. तेव्हा प्रत्येकाने आपले काम चोखपणे करावे. शिवभक्तांना सर्व सोयी सवलती विहित मुदतीत उपलब्ध करून द्याव्यात त्यामध्ये कुठलेही हयगय करू नये असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यंदा मान्सून लवकर सुरु झाला आहॆ. त्यामुळे पावसाची शक्यता लक्षात घेऊन मंडप, भोजन, विद्युत आणि आरोग्य व्यवस्था तैनात ठेवाव्यात. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास वैद्यकीय पथक सुसज्ज ठेवावे, गडावर पुरेश्या प्रमाणात वैद्यकीय पथक, स्ट्रेचर, औषधसाठा ठेवावा. विशेषता सर्पदंश होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याप्रमाणे औषधे उपलब्ध ठेवावीत. जिल्हा प्रशासनाने कार्यक्रम नियोजनासाठी गठीत केलेल्या समित्यानी आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी असेही श्री गोगावले यांनी सांगितले. जिल्हाधिकारी श्री जावळे म्हणाले की,शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने वेगवेगळ्या समित्याची नेमणूक केली आहे. मुख्यत्वे आरोग्य,पाणी पुरवठा,मंडप,खानपान, राजशिष्टाचार,परिवहन, विद्युत, पाणी आणि शौचालय आदी सर्व समित्यांची नेमणूक केली आहॆ. सर्व नियोजन सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकीत सर्व समित्यानी केलेल्या कामाचा आढावा सादर केला. तसेच कोकण कडा मित्र मंडळाने देखील आवश्यक बाबीबाबत सूचना केल्या.

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई द्यावी – आमदार विलास तरे# जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांना दिले निवेदन

ब्रेकवॉटर भिंत व प्रवासी जेटी प्रकल्पामुळे पर्यटन व मत्स्यव्यवसायाला चालना     – मत्स्यव्यवसाय,बंदरे मंत्री नितेश राणे*

भारतदुर्गा मंदिर नवचेतना जागृत करून प्रेरणा देईल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट परिसरात भारतदुर्गा मंदिराचा शिलान्यास

जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न-खरीप हंगामात कृषी विभागाने शेतकऱ्यांना खते व बियाणांचा पुरवठा सुरळीत होण्याची दक्षता घ्यावी — रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले