vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७(१) व (३) आदेश जारी

पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७(१) व (३) आदेश जारी

पुणे प्रतिनिधी-पुणे ग्रामीण जिल्हयामध्ये शांतता व सुव्यवस्था राखणेकामी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करुन व The Maharashtra Police Act (Bombay Aet No.XXII OF १९५१) (Title Substituted For The Bombay Police Act, १९५२) चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करुन पुणे ग्रामीण जिल्हयामध्ये १६ एप्रिल २०२६ रोजी २४ वाजेपर्यंत खाली नमूद केलेली कृत्य करण्यास या आदेशान्वये मनाई करीत आहेत.

कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेणे. दगड अथवा शस्त्रे किवा अस्खे सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे. शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारिरीक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे. कोणत्याही इसमाचे चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढा-यांचे चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे. मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे. ज्यामुळे सभ्यता अगर नितिमत्ता यास धोका पोहचेल किवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किवा अविर्भाव करणे कोणतेही जिन्नस तयार करुन त्याचा जनतेत प्रसार करणे. ज्या योगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पध्दतीने कलम ३७ (१) व (३) विरुध्द वर्तन करणे. कलम ३७ चे पोटकलम (३) अन्वये पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करणे, तसेच पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे पुर्व परवानगी शिवाय सभा घेणे किंवा मिरवणुका काढणे

वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरीष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार वाळगणे आवश्यक आहे व त्याबबात परवानगी आहे त्यांना लागू होणार नाही.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती The Maharashtra Police Act (Bombay Act No. XXII Of १९५१) (Title Substituted For The Bombay Police Act, १९५१) चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल

00000

संबंधित पोस्ट

लातूर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक नागरिकांकडून दहा जणांची सुखरूप सुटका; भारतीय सैन्याचे पथक लवकरच दाखल होणार

नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील अमोघ बनसोडे या विद्यार्थ्याची साता समुद्रापार गुणवत्तापूर्ण झेप

तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जनजीवन विस्कळीत झालेल्या मुंबई आणि ठाणे शहरातील विविध भागांची पाहणी केली

vishwatmaklokswamivarta

इराण-इराक मधील संभाव्य युद्धजन्य परिस्थितीनुषंगाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन-जिल्हा प्रशासन नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर  – जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

ताजनापूर उपसा सिंचन टप्पा-१ सुप्रमासाठी प्रस्ताव सादर करावा- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

कोल्हापुरचा अजिंक्य रेडकर नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचा विजेता-नेरूळच्या निरंत पाटील याने पटकाविला नमुंमपा क्षेत्र श्री सन्मान